जबरदस्त! सॅमसंग-शाओमीला झेपलं नाही ते Vivo करणार; 10 मिनिटांत फुल चार्ज होणार स्मार्टफोन 

By सिद्धेश जाधव | Published: June 2, 2022 12:56 PM2022-06-02T12:56:00+5:302022-06-02T12:56:15+5:30

Vivo सध्या एका फ्लॅगशिप स्मार्टफोनवर काम करत आहे जो 200W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. 

Vivo May Launch A 200W Fast Charging Flagship Smartphone  | जबरदस्त! सॅमसंग-शाओमीला झेपलं नाही ते Vivo करणार; 10 मिनिटांत फुल चार्ज होणार स्मार्टफोन 

जबरदस्त! सॅमसंग-शाओमीला झेपलं नाही ते Vivo करणार; 10 मिनिटांत फुल चार्ज होणार स्मार्टफोन 

Next

Vivo आपल्या फ्लॅगशिप लाईनअप अर्थात एक्स सीरिज सोबत अनेक भन्नाट फीचर्स बाजारात घेऊन येत असते. गिम्बल स्टॅबिलायजेशन, नाईट मोड, पॉपअप कॅमेरा इत्यादी अनेक फीचर्स ग्राहकांनी पहिले आहेत. आता अशी बातमी आली आहे की विवो एका नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोनवर काम करत आहे जो 200W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.  

Vivo आधी 100W फास्ट चार्जिंग असेलल्या स्मार्टफोनवर काम करत होती, परंतु आता एक नवीन चार्जिंग अडॅप्टरसह कंपनी 200W फास्ट चार्जिंगच्या पुढे जाऊ शकते. नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन 20V/10A चार्जिंगला सपोर्ट करू शकतो. संपूर्ण लाईनअप 120W, 80W आणि 66W चार्जिंग रेटसह बॅकव्हर्ड कम्पॅटिबल असेल. अशी माहिती टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशननं Weibo वर पोस्ट करून दिली आहे.  

टिप्सटरनेनं हे देखील सांगितलं होतं की स्मार्टफोनमध्ये 4000mAh पेक्षा जास्त मोठी बॅटरी दिली जाऊ शकते. परंतु याव्यतिरिक्त इतर कोणतीही माहिती समोर आली नाही. तसेच कंपनीनं देखील याबाबत कोणताही खुलासा केला नाही. गेल्यावर शाओमीनं आपल्या 200W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीचा डेमो दाखवला होता. परंतु ही टेक्नॉलॉजी असलेला कोणताही हँडसेट बाजारात सादर केला नाही. विवोनं 200W फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेला डिवाइस सादर केल्यास कंपनी शाओमीला मात देऊ शकते.  

Vivo X80 Pro चे स्पेसिफिकेशन्स   

Vivo X80 Pro मध्ये देखील 6.78-इंचाचा डिस्प्ले 2K रिजोल्यूशनसह देण्यात आला आहे. तसेच हा HDR10+ ला आणि 1500 निट्स पीक ब्राईटनेसला सपोर्ट करते. या मॉडेलमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 1 चिपसेट मिळतो. यात 4700mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 80W फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.  

कॅमेरा सेगमेंट देखील खास आहे. यात Vivo V1+ ISP आहे आणि त्याचबरोबर मुख्य कॅमेऱ्यासाठी 50MP चा Samsung GNV सेन्सर मिळतो. मागे एक 48MP ची Sony IMX598 अल्ट्रावाईड अँगल लेन्स, 12MP Sony IMX663 टेलीफोटो लेन्स आणि 8MP पेरीस्कोप लेन्स मिळते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो.     

Web Title: Vivo May Launch A 200W Fast Charging Flagship Smartphone 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.