आतापर्यंतचा सर्वात पॉवरफुल Vivo Phone असेल Vivo NEX 5; लवकरच येणार बाजारात 

By सिद्धेश जाधव | Published: October 25, 2021 07:32 PM2021-10-25T19:32:12+5:302021-10-25T19:32:53+5:30

Upcoming Vivo Phone Vivo Nex: विवोचा आगामी NEX सीरीजमधील स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 898 प्रोसेसरसादर केले जाऊ शकतात. हा फोन Vivo NEX Fold नावाने देखील सादर केला जाऊ शकतो.  

Vivo nex series smartphone may come with snapdragon 898 soc expected launch soon specification details  | आतापर्यंतचा सर्वात पॉवरफुल Vivo Phone असेल Vivo NEX 5; लवकरच येणार बाजारात 

आतापर्यंतचा सर्वात पॉवरफुल Vivo Phone असेल Vivo NEX 5; लवकरच येणार बाजारात 

googlenewsNext

विवोच्या आगामी NEX लाईनअपच्या बातम्या येण्यास सुरुवात झाली आहे. लिक्स आणि रिपोर्ट्समधून या सीरिजच्या स्पेक्सची माहिती देखील येत आहे. गेल्यावर्षी या लाइनअप अंतगर्त Vivo Nex 3S 5G Phone लाँच करण्यात होता. त्यानंतर आता कंपनी थेट Vivo NEX 5 स्मार्टफोन लाँच करणार आहे. काही रिपोर्ट्स कंपनीच्या फोल्डेबल स्मार्टफोनची माहिती मिळाली आहे. त्यानुसार नेक्स सीरिजमधील आगामी फोन Vivo NEX Fold असेल.  

टिपस्टर Digital Chat Station ने Vivo चा NEX लाइनअप अंतगर्त आपला नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे, असे सांगितले आहे. तसेच हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 898 प्रोसेसरसह बाजारात येईल, याची माहिती देखील मिळाली आहे. या सीरिजच्या नंतर सब-ब्रँड iQOO अंतर्गत iQOO 9 सीरीज लाँच केली जाऊ शकते. या सीरिजमध्ये देखील क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 898 प्रोसेसरचा वापर केला जाऊ शकतो.  

शाओमी आणि सॅमसंग देखील या क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 898 प्रोसेसरचा वापर आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोन्समध्ये करणार आहेत. सॅमसंग या प्रोसेसरसह Galaxy S22 सीरिज सादर करू शकते. तर Xiaomi 12 स्मार्टफोन या पॉवरफुल चिपसेटसह बाजारात येऊ शकतो. परंतु कोणत्याही कंपनीने याची अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे Vivo NEX 5 च्या अचूक स्पेक्ससाठी आपल्याला फोनच्या लाँचची वाट बघावी लागेल.  

Web Title: Vivo nex series smartphone may come with snapdragon 898 soc expected launch soon specification details 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.