Vivo चा जबराट NEX स्मार्टफोन Snapdragon 888 चिपसेटसह होऊ शकतो लाँच, लीक झाली माहिती 

By सिद्धेश जाधव | Published: October 12, 2021 12:29 PM2021-10-12T12:29:01+5:302021-10-12T12:49:26+5:30

Vivo Nex 5 Launch:

Vivo Nex smartphone will be launched with snapdragon 888 soc  | Vivo चा जबराट NEX स्मार्टफोन Snapdragon 888 चिपसेटसह होऊ शकतो लाँच, लीक झाली माहिती 

Vivo चा जबराट NEX स्मार्टफोन Snapdragon 888 चिपसेटसह होऊ शकतो लाँच, लीक झाली माहिती 

Next

Vivo आपल्या NEX लाईनअप अंतर्गत सर्वात प्रीमियम स्मार्टफोन सादर करत असते. या फोनच्या डिजाईन पासून हार्डवेअर पर्यंत फ्लॅगशिप स्पेक्सचा वापर केला जातो. आता कंपनीच्या आगामी Vivo Nex ची माहिती समोर येऊ लागली आहे. प्रसिद्ध टिपस्टर Digital Chat Station ने विवोच्या या आगामी प्रीमियम स्मार्टफोनची माहिती लीक केली आहे.  

Vivo NEX मधील प्रोसेसर  

समोर आलेल्या लिक्सनुसार आगामी NEX स्मार्टफोन NEX 5 नावाने सादर केला जाऊ शकतो. याआधी कंपनीने Nex 3 स्मार्टफोन सादर केला होता. चीनमध्ये 4 हा अंक अशुभ मनात असल्यामुळे कंपनीने थेट Nex 5 नावाने आगामी प्रीमियम फोन सादर करू शकते. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 888 चिपसेटचा वापर केला जाऊ शकतो, अशी माहिती लीक झाली आहे.  

Vivo Nex 5 चे इतर स्पेक्स 

हा आगामी NEX फोन को नवीन डिजाइनसह सादर केला जाऊ शकतो, अशी हिंट लिक्स्टरने दिली आहे. तसेच हा स्मार्टफोन 6.78-इंचाच्या क्वॉड कर्व डिस्प्लेसह दोन व्हेरिएंट्समध्ये सादर केला जाऊ शकतो. यातील पहिला व्हेरिएंट अंडर डिस्प्ले सेल्फी कॅमेऱ्यासह बाजारात येईल, तर दुसऱ्या व्हेरिएंटमध्ये पंच होलमध्ये सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो.  

हा प्रीमियम विवो फोन IP68 डस्ट आणि वॉटर रेजिस्टन्ससह सादर केला जाऊ शकतो. तसेच या फोनमध्ये कंपनी Samsung 50MP GN2 कॅमेरा सेन्सरचा वापर करू शकते, जो Zeiss ऑप्टिक्स आणि OIS सह सादर केला जाईल. तसेच Vivo X70 सीरिज प्रमाणे यात Gimbal Stabilisation 2.0 देखील मिळू शकते. या फोनला 4500mAh ची बॅटरी पॉवर देखील. यातील चार्जिंग स्पीड 66W वायर्ड आणि 40W वायरलेस असू शकतो. याआधी आलेल्या रिपोर्ट्समध्ये 120W Super Flash Charge वायर्ड आणि 60W वायरलेस चार्जिंगचा दावा करण्यात आला आहे.  

Web Title: Vivo Nex smartphone will be launched with snapdragon 888 soc 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.