108MP कॅमेरा आणि 12GB रॅमसह Vivo ची जबरदस्त S10 सीरिज लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

By सिद्धेश जाधव | Published: July 16, 2021 12:23 PM2021-07-16T12:23:29+5:302021-07-16T12:25:24+5:30

Vivo S10 and Vivo S10 Pro Launch: Vivo S10 आणि Vivo S10 Pro या दोन स्मार्टफोन्सचे जवळपास सर्वात स्पेसिफिकेशन्स एकसारखे आहेत. या दोन्ही फोन्समधील मुख्य फरक रियर कॅमेरा सेन्सरचा आहे.

Vivo s10 and vivo s10 pro launched with 12gb ram 108MP camera price specifications  | 108MP कॅमेरा आणि 12GB रॅमसह Vivo ची जबरदस्त S10 सीरिज लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

फ्रंट कॅमेऱ्यासह ड्युअल एलईडी फ्लॅश देखील देण्यात आला आहे.

Next

गेले कित्येक दिवस Vivo च्या Vivo S10 सीरीजबाबत बातम्या येत होत्या. आता कंपनीने या सीरिजअंतर्गत Vivo S10 आणि Vivo S10 Pro स्मार्टफोन्स आपल्या गृह बाजार चीनमध्ये लाँच केले आहेत. लवकरच ही सीरिज भारतासह जगभरातील बाजारपेठांमध्ये उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे. पुढे आम्ही Vivo S10 आणि Vivo S10 Pro च्या स्पेसिफिकेशन आणि किंमतीची माहिती दिली आहे.  

Vivo S10 आणि Vivo S10 Pro ची किंमत 

Vivo S10 च्या 8GB+128GB व्हेरिएंटची किंमत CNY 2,799 (अंदाजे 32,300 रुपये) आणि 12GB + 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत CNY 2,999 (अंदाजे 35,000 रुपये) आहे. तर Vivo S10 Pro चा एकमेव 12GB+256GB मॉडेल CNY 3,399 (जवळपास 39,000 रुपये) मध्ये उपलब्ध होईल. हे दोन्ही फोन्स चीनमध्ये 15 जुलैपासून प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध होतील आणि 23 जुलैपासून विकत घेता येतील.  

Vivo S10 Pro चे स्पेसिफिकेशन 

Vivo S10 Pro मध्ये 6.44 इंचाचा सुपर अ‍ॅमोलेड फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 1100 प्रोसेसरसह येतो. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित FunTouch OS 11.1 वर चालतो. फोटोग्राफीसाठी कंपनीने Vivo S10 Pro स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात 108 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. हा फोन 44 मेगापिक्सल + 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो, या फ्रंट कॅमेऱ्यासह ड्युअल एलईडी फ्लॅश देखील देण्यात आला आहे. या फोनमध्ये 4,000mAh ची बॅटरी 44W चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे.  

Vivo S10 चे स्पेसिफिकेशन 

Vivo S10 आणि Vivo S10 Pro या दोन स्मार्टफोन्सचे जवळपास सर्वात स्पेसिफिकेशन्स एकसारखे आहेत. या दोन्ही फोन्समधील मुख्य फरक रियर कॅमेरा सेन्सरचा आहे. Vivo S10 Pro मध्ये 108 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा सेन्सर आहे, तर Vivo S10 मध्ये 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा सेन्सर मिळतो.  

 

Web Title: Vivo s10 and vivo s10 pro launched with 12gb ram 108MP camera price specifications 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.