Vivo फॅन्ससाठी खुशखबर! पुढील आठवड्यात लाँच होणार पॉवरफुल स्मार्टफोन, लाँचपूर्वीच माहिती मिळाली माहिती
By सिद्धेश जाधव | Published: December 17, 2021 03:16 PM2021-12-17T15:16:31+5:302021-12-17T15:16:49+5:30
Vivo S12 Launch: हा एक सेल्फी सेंट्रिक फोन असेल. Vivo S12 च्या फ्रंटला 44 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर मिळेल.
Vivo येत्या 22 डिसेंबरला आपली ‘विवो एस12’ सीरीज सादर करणार आहे. या सीरिजमध्ये Vivo S12 आणि Vivo S12 Pro हे दोन स्मार्टफोन लाँच केले जातील. आतापर्यंत तुकड्या तुकड्यांमध्ये या फोन्सची माहिती समोर आली होती. परंतु आता सीरिज Vivo S12 च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीची देखील माहिती मिळाली आहे.
Vivo S12 चे लीक स्पेसिफिकेशन्स
सर्वप्रथम या फोनचा फोटोग्राफी सेगमेंट पाहू कारण हा एक सेल्फी सेंट्रिक फोन असेल. Vivo S12 च्या फ्रंटला 44 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर मिळेल. सेकंडरी सेन्सरचा वापर ग्रुप सेल्फीमध्ये जास्त माणसं समाविष्ट करण्यासाठी करता येईल. तसेच फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाईल. ज्यात 108 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर असेल.
Vivo S12 स्मार्टफोन 6.44 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह बाजारात येईल. फोनच्या हॉरीझॉन्टल नॉचमध्ये दोन सेल्फी कॅमेरे देण्यात येतील. हा अॅमोलेड डिस्प्ले 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. हा फोन अँड्रॉइड 11 सह ओरिजनओएस ओशियन युआय वर चालेल. प्रोसेसिंगसाठी विवो एस12 मध्ये मीडियाटेकचा डिमेनसिटी 1100 चिपसेट दिला जाऊ शकतो. त्याचबरोबर 12 जीबी पर्यंतचा रॅम दिली जाईल. पॉवर बॅकअपसाठी Vivo S12 मध्ये 44वॉट फास्ट चार्जिंगसह 4,200एमएएचची बॅटरी मिळेल.
Vivo S12 ची किंमत
Vivo S12 चा 8GB RAM आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट 2999 युआन (सुमारे 35,700 रुपये) मध्ये सादर करण्यात येईल. तर 12GB RAM आणि 256GB स्टोरेजसती 3339 युआन (सुमारे 40,700 रुपये) मोजावे लागतील. हा फोन Shimmering Black, Warm Gold आणि Lake Blue कलरमध्ये खरेदी करता येईल.