Vivo चा सर्वात फास्ट आणि स्लिम 5G Smartphone लाँच; कमी किंमतीत 5000mAh बॅटरी आणि 64MP कॅमेरा
By सिद्धेश जाधव | Published: February 9, 2022 03:20 PM2022-02-09T15:20:10+5:302022-02-09T15:24:59+5:30
Vivo T1 5G Price In India: Vivo T1 5G भारतात 120Hz रिफ्रेश रेट, 8GB RAM, 5000mAh बॅटरी आणि 64MP कॅमेऱ्यासह लाँच करण्यात आला आहे.
Vivo T1 5G India Launch: गेले कित्येक दिवस चर्चेत राहिलेला Vivo T1 5G स्मार्टफोन आज भारत लाँच करण्यात आला आहे. हा फोन भारतात 120Hz रिफ्रेश रेट, 8GB RAM, 5000mAh बॅटरी आणि 64MP कॅमेऱ्यासह लाँच करण्यात आला आहे. हा विवोचा सर्वात स्लिम 5G फोन असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. विवो टी1 5जी स्मार्टफोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart वरून विकत घेता येईल.
Vivo T1 5G चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
Vivo T1 5G मध्ये 6.58-इंचाची फुल एचडी+ एलसीडी स्क्रीन देण्यात येईल. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. या फोनला क्वॉलकॉमच्या Snapdragon 695 चिपसेटची प्रोसेसिंग पावर देण्यात आली आहे. सोबत 8GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन अँड्रॉइड 12 आधारित फनटच ओएसवर चालतो.
फोटोग्राफीसाठी Vivo T1 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेन्सचा समावेश आहे. सिक्योरिटीसाठी साईड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. Vivo T1 मध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.
Vivo T1 5G की किंमत आणि सेल
Vivo T1 5G चे तीन व्हेरिएंट भारतात आलेआहेत . हा फोन 14 फेब्रुवारीपशुउन फ्लिपकार्टसह कंपनीच्या अधिकृत वेबसाईट आणि ऑफलाईन रिटेल स्टोर्सवरून विकत घेता येईल. एचडीएफसी बँकेच्या कार्डचा वापर करून हा फोन विकत घेतल्यास 1000 रुपयांची सूट मिळेल.
- Vivo T1 5G 4GB/128GB: 15,990 रुपये
- Vivo T1 5G 6GB/128GB: 16,990 रुपये
- Vivo T1 5G 8GB/128GB: 19,990 रुपये
हे देखील वाचा:
- Xiaomi नं भारतात लाँच केला नवीन स्वस्त स्मार्टफोन; असे आहेत दमदार Redmi Note 11 चे स्पेक्स
- हे आहेत 6 'बेस्ट' पासवर्ड मॅनेजर अॅप्स जे तुम्हाला कधीच विसरू देणार नाहीत महत्वाचे लॉगिन डिटेल्स