10 हजारांत नवाकोरा 5G Smartphone; पहिल्याच सेलमध्ये 64MP कॅमेरा असलेला Vivo मोबाईल स्वस्तात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2022 01:21 PM2022-05-07T13:21:09+5:302022-05-07T13:22:00+5:30

Vivo T1 Pro 5G स्मार्टफोन आजपासून विकत घेता येणार आहे. हा फोन 24 हजारांत लाँच झाला असला तरी 10  हजारांत विकत घेता येईल.  

Vivo T1 Pro 5G Available For Sale In India From Today Know Price Offers And More  | 10 हजारांत नवाकोरा 5G Smartphone; पहिल्याच सेलमध्ये 64MP कॅमेरा असलेला Vivo मोबाईल स्वस्तात

10 हजारांत नवाकोरा 5G Smartphone; पहिल्याच सेलमध्ये 64MP कॅमेरा असलेला Vivo मोबाईल स्वस्तात

Next

Snapdragon 778G प्रोसेसर, 10GB रॅम, 66W फास्ट चार्जिंग आणि 64MP कॅमेरा असलेला Vivo T1 Pro 5G स्मार्टफोन गेल्या आठवड्यात भारतात लाँच झाला आहे. आज म्हणजे 7 मेपासून या हँडसेटची विक्री विवो करणार आहे. जरी या डिवाइसची किंमत मिड रेंजमध्ये असली तरी तुम्ही हा फोन 10 हजारांच्या आत घरी आणू शकता. यासाठी तुम्हाला काही ऑफर्सचा फायदा घ्यावा लागेल. ज्यांची माहिती आम्ही पुढे दिली आहे.  

Vivo T1 Pro 5G ची किंमत आणि ऑफर्स  

Vivo T1 Pro 5G स्मार्टफोनचा 6GB रॅम व 128GB इंटरनल स्टोरेज मॉडेल 23,999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे. तर रॅम 8GB रॅम व 128GB मॉडेलची किंमत 24,999 रुपये आहे. हा फोन टर्बो ब्लॅक आणि टर्बो सियान कलरमध्ये फ्लिपकार्ट, विवो ई-स्टोर आणि ऑफलाईन रिटेल स्टोर्सवरून विकत घेता येईल.  

लाँच ऑफर्स अंतगर्त ग्राहक आयसीआयसीआय, एसबीआय, आयडीएफसी फर्स्ट बँक आणि वनकार्ड धारकांना 2500 रुपयांपर्यंतचा अतिरिक्त डिस्काउंट मिळेल. तसेच तुम्ही जुना फोन एक्सचेंज करून 13,000 रुपयांपर्यंतची सूट मिळेल. त्यामुळे 24 हजारांचा हा डिवाइस फक्त 9,249 रुपयांमध्ये तुमचा होईल.  

Vivo T1 Pro चे स्पेसिफिकेशन्स  

Vivo T1 Pro च्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. या कॅमेरा सेटअपमध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा-वाईड लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा मिळतो. फ्रंटला 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. या फोनमध्ये पावर बॅकअपसाठी 4,700mAh ची बॅटरी मिळते जी 66 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. 

Vivo T1 Pro फोनमध्ये 6.44-इंचाचा फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. जो वॉटरड्रॉप नॉचसह 1300 निट्स पीक ब्राईटनेस, एचडीआर10+ आणि एसजीएस आय प्रोटेक्शनला सपोर्ट जातो. प्रोसेसिंगसाठी कंपनीनं Qualcomm Snapdragon 778G 5G चिपसेटचा वापर केला आहे. ग्राफिक्ससाठी एड्रेनो 642L GPU मिळतो.  

फोनच्या छोट्या व्हेरिएंटमध्ये 4GB तर मोठ्या व्हेरिएंटमध्ये 2GB व्हर्च्युअल रॅम मिळतो. हा फोन अँड्रॉइड 12 आधारित फनटच 12 ओएसवर चालतो. कनेक्टिव्हिटीसाठी या 5जी फोनमध्ये वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट मिळतात. तर सिक्योरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. हा फोन 8 लेयर कूलिंगसह बाजारात येतो.   

Web Title: Vivo T1 Pro 5G Available For Sale In India From Today Know Price Offers And More 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.