Vivo करणार कमाल! पुढील आठवड्यात येणार दणकट 5G स्मार्टफोन, स्वस्तात दमदार स्पेसिफिकेशन
By सिद्धेश जाधव | Published: May 17, 2022 03:56 PM2022-05-17T15:56:02+5:302022-05-17T15:56:25+5:30
Vivo T2 5G स्मार्टफोनची लाँच डेट समोर आली आहे. हा फोन Snapdragon 870 या फ्लॅगशिप चिपसेटसह सादर केला जाऊ शकतो.
Vivo T2 5G स्मार्टफोन लवकरच लाँच केला जाऊ शकतो. हा फोन गेल्यावर्षी चीनमध्ये आलेल्या Vivo T1 5G स्मार्टफोनचा अपग्रेड व्हर्जन असेल. कंपनीनं या सीरिजमध्ये आणखी दोन स्मार्टफोन सादर केले आहेत. आता Vivo T2 5G स्मार्टफोन Vivo China ची वेबसाईट, Suning आणि JD.com वर लिस्ट झाला आहे. लिस्टिंगमधून स्मार्टफोनच्या रेंडरची माहिती मिळाली आहे.
चीनच्या लोकप्रिय टिपस्टरनं Vivo T2 5G च्या लाँच डेटची माहिती दिली आहे. टिपस्टर Why LAB नुसार, हा स्मार्टफोन Snapdragon 870 प्रोसेसरसह iQOO Neo6 SE चा रीब्रँडेड व्हर्जन असेल, जो अलीकडेच चीनमध्ये आला आहे. Bald is Panda टिपस्टर ने Vivo T2 5G च्या लाँच डेटची घोषणा केली आहे. त्यानुसार, स्मार्टफोन चीनमध्ये 23 मेला लाँच केला जाईल. त्यादिवशी चीनमध्ये Vivo S15 आणि S15 Pro स्मार्टफोन देखील सादर केले जाणार आहेत.
संभाव्य स्पेसिफिकेशन
लिस्टिंगमधून Vivo T2 5G च्या स्पेसिफिकेशनची जास्त माहिती मिळाली नाही. फक्त यातील 5G सपोर्ट कन्फर्म झाला आहे. तसेच या फोनमध्ये FHD+ रिजोल्यूशन असलेला LCD पॅनल मिळू शकतो. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह बाजारात येईल. फोन Android 12 वर चालेल. याव्यतिरिक्त इतर कोणतीही माहिती मात्र मिळाली नाही.