व्हिवोचा V11 Pro आला; ड्रॉप नॉच डिस्प्ले, दमदार कॅमेरा....बरच काही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 15:32 IST2018-09-06T15:28:51+5:302018-09-06T15:32:40+5:30
Vivo V11 Pro Launch: नव्या प्रकारच्या डिस्प्लेसह मेक इन इंडिया अंतर्गत तो भारतात बनविण्यात आला आहे. चला जाणून घेऊया या फोनमध्ये काय खास आहे.

व्हिवोचा V11 Pro आला; ड्रॉप नॉच डिस्प्ले, दमदार कॅमेरा....बरच काही!
मुंबई : चीनची कंपनी व्हिवोने दमदार कॅमेरा आणि बरीच वैशिष्ट्ये असलेला स्मार्टफोन V11 pro अभिनेता अमीर खानच्या हस्ते भारतात लाँच केला. नव्या प्रकारच्या डिस्प्लेसह मेक इन इंडिया अंतर्गत तो भारतात बनविण्यात आला आहे. चला जाणून घेऊया या फोनमध्ये काय खास आहे.
Vivo V11 Pro या स्मार्टफोनमध्ये 6.4 इंचाचा ड्रॉप नॉच डिस्प्ले आहे जो ओप्पोच्या F9 pro मध्ये आहे. तसेच डिस्प्लेवरच फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. हा डिस्प्ले सुपर अॅमोल्ड असून अशा प्रकारचा डिस्प्ले आधी सॅमसंमगच्या मोबाईलमध्ये येत होता. या मोबाईलमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 गीगाहट्झचा ऑक्टाकोअर प्रोसेसर देण्यात आला आहे.
कॅमेरा : Vivo V11 Pro मध्ये 12 आणि ५ मेगापिक्सलचा ड्युअल रिअर कॅमेरा एआय फिचरसह देण्यात आला आहे. तसेच पुढील बाजुला 25 मेगापिक्सलचा सेल्फी एआय सेंसरचा कॅमेरा दिला आहे. तसेच फास्ट चार्जिंगसाठी ड्युअल इंजिन चार्जिंग दिले आहे. जे ओप्पोच्या व्हूक या प्रणालीशी स्पर्धा करते.
V11 Pro मध्ये फेस डिटेक्शन होत असून रात्रीच्यावेळी इन्फ्रारेडचा वापर केला जातो. सेल्फी कॅमेरॅसाठी फनमोजी या इमोजीही देण्यात आल्या आहेत. वजनाच्या बाबतीत सॅमसंग किंवा इतर फोनच्या तुलनेत हलका आहे. हा फोन गोल्डन आणि ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध आहे.
When Perfection meets Innovation #VivoV11Pro#UnlockTheAmazingpic.twitter.com/OMHecX5vpS
— Vivo India (@Vivo_India) September 6, 2018
मेमरी : 6 जीबी मेमरी आणि ६४ जीबी इंटरनल मेमरी अशा एकाच प्रकारामध्ये हा फोन उपलब्ध आहे. जादा मेमरी हवी असल्यास मायक्रो एसडी कार्डद्वारे ती वाढवू शकतात.
किंमत : अॅमेझॉनवर हा फोन उपलब्ध होणार आहे. या फोनची किंमत 25,990 रुपये असून प्री बुकिंगवर ऑफर्स ठेवण्यात आल्या आहेत.