Vivo ने चालवले 5G स्लीमट्रीमचे चक्कर; V20 Pro लाँच करत दिली OnePlus, Moto ला टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2020 03:20 PM2020-12-02T15:20:12+5:302020-12-02T15:20:58+5:30

Vivo V20 Pro 5G launched: Vivo V20 Pro चे एकच व्हेरिअंट कंपनीने लाँच केले आहे. हा फोन ऑनलाईन, ऑफलाईन रिटेल स्टोअरवर खरेदी करता येणार आहे. ऑफरनुसार युजरला १० टक्के कॅशबॅक दिला जाणार आहे. यासाठी ICICI बँकेचे कार्ड असणे गरजेचे आहे. 

Vivo V20 Pro world slimmest 5G launched; OnePlus, Moto gets big hit by Vivo | Vivo ने चालवले 5G स्लीमट्रीमचे चक्कर; V20 Pro लाँच करत दिली OnePlus, Moto ला टक्कर

Vivo ने चालवले 5G स्लीमट्रीमचे चक्कर; V20 Pro लाँच करत दिली OnePlus, Moto ला टक्कर

Next

चीनची आणखी एक कंपनी व्हिवोने भारतात पहिला 5G फोन लाँच केला आहे. Vivo V20 Pro चे डिझाईन प्रिमिअम ठेवण्यात आले असून दोन सेल्फी कॅमेरे देण्यात आले आहेत. या फोनची किंमत 29,990 रुपये ठेवण्यात आली आहे. 

Vivo V20 Pro चे एकच व्हेरिअंट कंपनीने लाँच केले आहे. हा फोन ऑनलाईन, ऑफलाईन रिटेल स्टोअरवर खरेदी करता येणार आहे. ऑफरनुसार युजरला १० टक्के कॅशबॅक दिला जाणार आहे. यासाठी ICICI बँकेचे कार्ड असणे गरजेचे आहे. 


स्पेसिफिकेशन आणि फिचर्स
Vivo V20 Pro मध्ये 6.44 इंचाचा फुल एचडी AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार ही सर्वात स्लीम 5जी स्मार्टफोन आहे. याची जाडी 7.39mm आहे. हा फोन Android 11 ऑपरेटिंग सिस्टिमवर चालतो. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 765G प्रोसेसर  देण्यात आला आहे. तसेच 8 जीबी रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. फोनमध्येच अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. 

Xiaomi भल्याभल्यांना रडवणार! Redmi Note 9 5G स्मार्टफोन 15000 रुपयांत लाँच


या किंमतीत सध्या हाय रिफ्रेशरेट दिला जात आहे. मात्र, व्हिवोने हे टाळले आहे. डिस्प्ले हा 60Hz च्या रिफ्रेश रेट असलेलाच ठेवण्यात आला आहे. यामुळे स्मूथ व्हिडीओ, गेम पाहणे कठीण जाणार आहे. या बदल्यात व्हिवोने हा फोन अधिकाधिक प्रिमिअम कसा दिसेल यावर लक्ष दिले आहे. 


कॅमेरा 
Vivo V20 Pro मध्ये तीन रिअर कॅमेरे देण्यात आले आहेत. तर सेल्फीसाठी दोन फ्रंट कॅमेरे देण्यात आले आहेत. रिअरला 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, दुसरा 8 मेगापिक्सल आणि तिसरा 2 मेगापिक्सलचा आहे. सेल्फीसाठी 44 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि दुसरा 8 मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला आहे. फोनची बॅटरी 4,000 mAh ची असून 33W फ़ास्ट चार्ज सपोर्ट करते. 

आधीच दोन 5G फोन बाजारात

Moto G 5G हा फोन ७ डिसेंबरपासून फ्लिपकार्टवर उपलब्ध होणार आहे. या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 750G प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच 6.7 इंच फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन पहिला युरोपमध्ये लाँच करण्यात आला होता. आता हा फोन भारतीय बाजारात लाँच करण्यात आल्याने चांगलेच प्राईस वॉर रंगणार आहे. Moto G 5G च्या 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 24,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर वनप्लसचा स्वस्त  5 जी फोन 25999 रुपयांपासून सुरु होतो. परंतू लाँच झाल्यापासून 27999 रुपयांचे व्हेरिअंटच उपलब्ध आहे. 

Web Title: Vivo V20 Pro world slimmest 5G launched; OnePlus, Moto gets big hit by Vivo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.