64MP कॅमेरा असलेला Vivo V21e 5G लवकरच होईल भारतात लाँच; स्पेसिफिकेशन झाले लीक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 06:59 PM2021-06-14T18:59:49+5:302021-06-14T19:01:50+5:30
Vivo V21e 5G: Vivo V21e 5G स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होऊ शकतो. Vivo ने एप्रिलच्या शेवटी Vivo V21 5G स्मार्टफोन भारतात लाँच केला होता.
चिनी कंपनी Vivo भारतात V21e 5G स्मार्टफोन लवकरच लाँच करू शकते. विशेष म्हणजे, कंपनीने एप्रिलमध्ये Vivo V21, Vivo V21 5G आणि Vivo V21e स्मार्टफोन्स मलेशियामध्ये लाँच केले होते. यातील Vivo V21 5G स्मार्टफोन एप्रिलच्या शेवटी भारतात लाँच केला गेला होता. ताज्या रिपोर्टनुसार, वीवो वी21ई स्मार्टफोन भारतात लवकरच लाँच केला जाऊ शकतो. (Vivo V21e 5G will come to india soon with 64mp camera and dimensity 700 chipset)
Vivo V21e 5G स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होऊ शकतो, अशी माहिती टिप्सटर ईशान अग्रवालने 91mobiles ला दिली आहे. या रिपोर्टमधून या फोनच्या लाँचची माहिती समोर आली नाही परंतु काही स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. त्यानुसार, या फोनमध्ये 6.44 इंचाचा फुल-एचडी प्लस अॅमोलेड डिस्प्ले देण्यात येईल. तसेच, या फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 700 चिपसेटसोबत 8 जीबी रॅम असेल. फोन स्टोरेज 128 जीबीसह येईल. हि स्टोरेज माइक्रो एसडी कार्डने वाढवता येईल.
वीवो वी21ई 5जी फोनमध्ये 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा असेल. या मुख्य कॅमेऱ्यासोबत 8 मेगापिक्सलचा सेकंडरी वाइड-अँगल लेंस असेल. फोनच्या फ्रंटला 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात येईल. या फोनला पावर देण्यासाठी 4,000mAh ची बॅटरी असेल, हि बॅटरी 44W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल.