24 जूनला लाँच होणार स्मार्टफोन Vivo V21e; ‘इतकी’ असेल 8GB RAM व्हेरिएंटची किंमत  

By सिद्धेश जाधव | Published: June 21, 2021 02:26 PM2021-06-21T14:26:24+5:302021-06-21T14:32:04+5:30

Vivo V21e India Launch: Vivo V21e च्या भारतीय लाँचच्या तारखेची घोषणा कंपनीने ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.  

Vivo V21e to launch in india on 24 june with 8GB RAM know specs price sale  | 24 जूनला लाँच होणार स्मार्टफोन Vivo V21e; ‘इतकी’ असेल 8GB RAM व्हेरिएंटची किंमत  

विवोच्या आगामी वी21ई ची किंमत एका लीकद्वारे समजली आहे.

Next

Vivo ने गेल्या आठवड्यात Vivo V21e स्मार्टफोनच्या लाँचची घोषणा केली होती. या फोनचे प्रोमोशन भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली करत आहे. आज कंपनीने विवो वी21ईची लाँच डेट सांगितली आहे. Vivo V21e स्मार्टफोन येत्या 24 जूनला भारतात लाँच केला जाईल, अशी माहिती कंपनीने अपने अधिकृत ट्वीटर हँडलच्या माध्यमातून सांगितले आहे. 24 जूनला एका ऑनलाइन इव्हेंटच्या माध्यमातून 5 वाजता Vivo V21e स्मार्टफोन भारतात लाँच केला जाईल. (Vivo V21e will launch in India through an virtula event on 24 June) 

Vivo V21e फोनची किंमत 

विवोच्या आगामी वी21ई ची किंमत एका लीकद्वारे समजली आहे. या लीकनुसार, Vivo V21e फोन भारतात 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह लाँच केला जाईल. तसेचमी या व्हेरिएंटची किंमत 24,990 रुपये असेल. परंतु हा फोन एकापेक्षा जास्त व्हेरिएंट्समध्ये लाँच होण्याची शक्यता आहे.  

Vivo V21e चे स्पेसिफिकेशन्स 

Vivo V21e स्मार्टफोनमध्ये 6.44-इंचाचा AMOLED डिस्प्ले FHD+ रिजोल्यूशनसह देण्यात येईल. हा फोन Dimensity 700 SoC सह सादर केला जाऊ शकतो. या चिपसेटची माहिती Geekbench आणि Google Play Console लिस्टिंगमधून समजली आहे. त्याचबरोबर Google Play Console लिस्टिंगवर हा फोन 8GB RAM आणि Android 11 सह दिसला होता.  

फोनच्या मागे ड्युअल कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. यात 64MP प्रायमरी कॅमेरा आणि 8MP चा अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा असेल. या फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात येईल. Vivo V21e 5G मध्ये 4,000mAh ची बॅटरी 44W फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात येईल.  

Web Title: Vivo V21e to launch in india on 24 june with 8GB RAM know specs price sale 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.