दोन सेल्फी कॅमेरे आणि फ्रंट फ्लॅशसह आला Vivo V23; 12GB RAM, 44W Fast चार्जिंगसह भारतात लाँच
By सिद्धेश जाधव | Published: January 5, 2022 03:20 PM2022-01-05T15:20:54+5:302022-01-05T15:21:37+5:30
Vivo V23 5G Price In India: Vivo V23 मध्ये 50MP Dual Selfie Camera, Mediatek Dimensity 920 चिपसेट आणि 44W Fast Charging असे स्पेक्स देण्यात आले आहेत.
Vivo V23 5G Price In India: Vivo V23 Series अंतगर्त कंपनीनं भारतात Vivo V23 आणि Vivo V23 Pro हे दोन स्मार्टफोन्स सादर केले आहेत. हे दोन्ही 5G Phone शानदार स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्ससह देशात आले आहेत. यातील Vivo V23 मध्ये 50MP Dual Selfie Camera, Mediatek Dimensity 920 चिपसेट आणि 44W Fast Charging असे स्पेक्स देण्यात आले आहेत.
Vivo V23 5G Phone चे स्पेसिफिकेशन्स
विवो वी23 5जी फोनमध्ये 6.44 इंचाचा अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. नॉच डिजाईनसह सादर करण्यात आलेला हा डिस्प्ले 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालतो. हा फोन अँड्रॉइड 12 आधारित फनटच ओएस 12 वर चालतो. यात मीडियाटेक डिमेनसिटी 920 चिपसेट आणि एआरएम माली जी68 जीपीयू देण्यात आला आहे.
विवो वी23 5जी च्या कॅमेरा सेगमेंट फ्रंट कॅमेरा खूप खास आहे. फ्रंट पॅनलवर 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर तसेच 8 मेगापिक्सलचा सुपर वाईड अँगल सेल्फी कॅमेरा असलेला ड्युअल सेल्फी कॅमेरा सेटअप मिळतो. तर मागे 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो सेन्सरसह ट्रिपल रियर कॅमेरा आहे. बेसिक कनेक्टिव्हिटीसह इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फिचर मिळतो. तर पॉवर बॅकअपसाठी Vivo V23 मध्ये 4,200एमएएचची बॅटरी 44वॉट फ्लॅश चार्ज सपोर्टसह देण्यात आली आहे.
Vivo V23 5G ची किंमत
विवो वी23 5जी फोनचे दोन व्हेरिएंट्स भारतात आले आहेत. यातील 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज व्हर्जनची किंमत 29,990 रुपये आहे. तर 12 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज मिळवण्यासाठी 34,990 रुपये द्यावे लागतील. हा फोन 19 जानेवारीपासून विवो स्टोर्स आणि फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल.
हे देखील वाचा:
तुमचे पॅन कार्ड बनावट नाही ना?
1 नव्हे तर 2 बॅटरीजसह आला Realme GT 2 5G Phone; सोबत 65W Charging, 12GB RAM