Vivo V23 Pro 5G Phone: भन्नाट! रंग बदलणारा भारतातील पहिला स्मार्टफोन लाँच; 108MP कॅमेरा, 16GB रॅमसह आला Vivo चा शानदार फोन
By सिद्धेश जाधव | Published: January 5, 2022 04:01 PM2022-01-05T16:01:33+5:302022-01-05T16:06:08+5:30
Vivo V23 Pro 5G Phone: Vivo V23 Pro 5G Phone भारतात 108MP Rear Camera, 16GB RAM, 50MP Selfie Camera आणि 44W फास्ट चार्जिंगसह विकत घेता येईल.
Vivo नं आज भारतीय टेक विश्वात धुमाकूळ घातला आहे. कंपनीनं V23 Series अंतर्गत Vivo V23 आणि Vivo V23 Pro असे दोन 5G Phone सादर केले आहेत. हे फोन्स फक्त शानदार दिसत नाहीत तर स्पेक्स देखील दमदार आहेत. सीरिजमध्ये Vivo V23 Pro स्मार्टफोन की फुल डिटेल शेयर की आहे.
Vivo V23 Pro चे स्पेसिफिकेशन्स
Vivo V23 Pro मध्ये 6.56 इंचाचा फुलएचडी+ अॅमोलेड डिस्प्ले मिळतो. जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. या फोनला मीडियाटेक डिमेनसिटी 1200 चिपसेटची प्रोसेसिंग पॉवर देण्यात आली आहे. सोबत ग्राफिक्ससाठी माली जी77 एमसी9 जीपीयू मिळतो. हा डिवाइस अँड्रॉइड 12 ओएस बेस्ड फनटच ओएस 12 वर चालतो.
यात 12GB पर्यंत RAM देण्यात आला आहे, सोबत 4GB व्हर्च्युअल रॅम मिळतो त्यामुळे एकूण 16GB रॅम होतो. हा फोन 256GB स्टोरेजसह विकत घेता येईल. Vivo V23 Pro एक ड्युअल सिम फोन 5G Phone आहे. बेसिक कनेक्टिव्हिटीसह यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तसेच पॉवर बॅकअपसाठी 4,300एमएएचची बॅटरी 44वॉट फ्लॅश चार्ज टेक्नॉलॉजीसह देण्यात आली आहे.
विवो वी23 प्रो च्या फ्रंटला ड्युअल सेल्फी कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि 8 मेगापिक्सलची सुपर वाईड अँगल लेन्स देण्यात आली आहे. सोबत कंपनीनं फ्रंट फ्लॅश देखील दिला आहे. बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह 108 मेगापिक्सलचा अल्ट्रा क्लियर प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. सोबत 8 मेगापिक्सलची वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची सुपर मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे.
Vivo V23 Pro ची किंमत
विवो वी23 प्रो च्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 38,990 रुपये ठेवण्यात आली आहे. तर फोनचा 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 43,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. सध्या प्री-बुकिंगसाठी आलेला हा फोन 13 जानेवारीपासून विवो स्टोर्स आणि फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल.
हे देखील वाचा:
दोन सेल्फी कॅमेरे आणि फ्रंट फ्लॅशसह आला Vivo V23; 12GB RAM, 44W Fast चार्जिंगसह भारतात लाँच
तुमचे पॅन कार्ड बनावट नाही ना?