विवो व्ही ९ यूथ : जाणून घ्या सर्व फिचर्स
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2018 04:30 PM2018-04-23T16:30:00+5:302018-04-23T16:30:00+5:30
विवो कंपनीने विवो व्ही ९ युथ हा नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतरण्याची घोषणा केली आहे. विवो कंपनीने अलीकडेच विवो व्ही ९ हा अतिशय उत्तमोत्तम फिचर्सने सज्ज असणारा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना सादर केला आहे.
विवो कंपनीने विवो व्ही ९ युथ हा नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतरण्याची घोषणा केली आहे. विवो कंपनीने अलीकडेच विवो व्ही ९ हा अतिशय उत्तमोत्तम फिचर्सने सज्ज असणारा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना सादर केला आहे. याचीच नवीन आवृत्ती युथ एडिशनच्या माध्यमातून सादर करण्यात आलेली आहे. अर्थात यात मूळ मॉडेलपेक्षा थोडे कमी फिचर्स देण्यात आले आहेत.
काळा आणि सोनेरी या दोन रंगाच्या पर्यायांमध्ये हे मॉडेल ग्राहकांना १८,९९९ रूपये मूल्यात देशभरातील शॉपीजमधून खरेदी करता येईल. याशिवाय, फ्लिपकार्ट, अमेझॉन इंडिया आणि पेटीएममॉल या शॉपिंग साईटवरूनही याला उपलब्ध करण्यात आले आहे. यातील ६.३ इंच आकारमानाचा डिस्प्ले फुल एचडी प्लस म्हणजेच २२८० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा असून यावर कॉर्नींग गोरीला ग्लास ३ चे संरक्षण आवरण आहे. यामध्ये क्वॉलकॉमचा ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन ४५० प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम ४ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे.
विवो व्ही ९ युथ या स्मार्टफोनच्या मागील बाजूस १६ आणि २ मेगापिक्सल्स क्षमतांचे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. यात बोके इफेक्ट देण्याची सुविधा आहे. याशिवाय यात कृत्रीम बुध्दीमत्तेने युक्त असणारी एआय ब्युटी मोड प्रणाली, टाईम लॅप्स फोटोग्राफी, प्रोफेशनल मोड, एआर स्टीकर्स, स्मार्ट मोशन, पॅनोरामा, कॅमेरा फिल्टर्स आदी फिचर्स देण्यात आले आहेत. याच्या मदतीने फोर-के क्षमतेचे चित्रीकरण करता येणार आहे. तर यात १६ मेगापिक्सल्स क्षमतेचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यात फिंगरप्रिंट स्कॅनर आदी फिचर्सदेखील देण्यात आले आहेत. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ओरियो या प्रणालीवर चालणारा असून यावर कंपनीचा फनटच ४.० हा युजर इंटरफेस देण्यात आला आहे. तसेच यात ३२६० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी दिलेली आहे.