एकच नंबर! 8 इंचाच्या 2K डिस्प्लेसह येईल Vivo X Fold; सॅमसंगचा दबदबा कमी होणार
By सिद्धेश जाधव | Published: April 5, 2022 07:13 PM2022-04-05T19:13:35+5:302022-04-05T19:18:13+5:30
Vivo X Fold लवर्क 8 इंचाचा 2K डिस्प्ले आणि 3D अल्ट्रासॉनिक ड्युअल-स्क्रीन फिंगरप्रिंट स्कॅनरसह सादर केला जाऊ शकतो.
Vivo X Fold कंपनीचा पहिलाच फोल्डेबल स्मार्टफोन असेल. सध्या फोल्डेबल सेगमेंटमध्ये सॅमसंगचा दबदबा आहे. चीनमध्ये 11 एप्रिलला एका इव्हेंटच्या माध्यमातून Vivo X Fold सर्वप्रथम ग्राहकांच्या भेटीला येईल. परंतु लाँच होण्यापूर्वीच या फोल्डेबल फोनचे रेंडर्स आणि आता फुल स्पेसिफिकेशन समोर आले आहेत. एका रिपोर्टमधून Vivo X Fold चं ऑफलाइन स्टोर्स मार्केटिंग मटेरियल लीक झालं आहे.
Vivo X Fold चे लीक स्पेसिफिकेशन्स
Vivo X Fold फोन Android 12 वर चालेल. यात 8 इंचाचा 2K डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह देण्यात येईल. हा जगातील पहिला 19 Display Mate A+ सर्टिफिकेशन असलेला डिस्प्ले असेल. फोनच्या बाहेरील बाजूस 6.53 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह मिळू शकतो. या आगामी Vivo फोनमध्ये क्वॉलकॉमच्या सर्वात शक्तिशाली Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरची ताकद मिळेल, सोबत LPDDR5 RAM आणि UFS 3.1 स्टोरेज असेल.
फोनच्या मागे Zeiss ब्रँडिंगसह क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यात ओआयएस सपोर्टसह 50MP Samsung GN5 प्रायमरी कॅमेरा, 48MP चा सेकंडरी सेन्सर, 12MP ची पोर्ट्रेट लेन्स आणि 5MP ची पेरिस्कोप लेन्स असेल. फ्रंट कॅमेऱ्याची माहिती मात्र मिळाली नाही. कनेक्टिव्हिटीसाठी यात Wi-Fi 6 आणि NFC मिळेल. सिक्योरिटीसाठी 3D अल्ट्रासॉनिक ड्युअल-स्क्रीन फिंगरप्रिंट स्कॅनर मिळेल. फोनमध्ये 4,600mAh ची बॅटरी 60W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह देण्यात येईल.