जे आजपर्यंत झालं नाही ते होणार; Vivo चे तीन हटके डिवाइस येतायत ग्राहकांच्या भेटीला  

By सिद्धेश जाधव | Published: March 26, 2022 08:04 PM2022-03-26T20:04:38+5:302022-03-26T20:06:25+5:30

Vivo कंपनी 28 मार्चला एका इव्हेंटच आयोजन करू शकते. या इव्हेंटमधून कंपनीचे तीन नवीन डिवाइस सादर ऐकेल जाऊ शकतात.  

Vivo X Fold Vivo X Note Vivo Pad May Launch On March 28   | जे आजपर्यंत झालं नाही ते होणार; Vivo चे तीन हटके डिवाइस येतायत ग्राहकांच्या भेटीला  

जे आजपर्यंत झालं नाही ते होणार; Vivo चे तीन हटके डिवाइस येतायत ग्राहकांच्या भेटीला  

googlenewsNext

Vivo कंपनी 28 मार्चला मोठी घोषणा करणार आहे. तसेच एका पोस्टरमधून कंपनीच्या पहिल्या फोल्डेबल स्मार्टफोनची माहिती मिळाली आहे. हा स्मार्टफोन Vivo X Fold नावानं सादर केला जाऊ शकतो. आता बातमी आली आहे की, या फोल्डेबल फोननंतर Vivo X Note आणि Vivo Pad टॅबलेटची देखील एंट्री एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात होऊ शकते. 28 मार्चला या डिवाइसच्या लाँचची तारीख सांगितली जाऊ शकते. लवकरच कंपनी पहिला फोल्डेबल आणि पहिला टॅबलेट सादर करू शकते.  

Vivo Pad  

विवो पॅड मध्ये 11 इंचाचा अवाढव्य डिस्प्ले 2560X1600 पिक्सल रिजोल्यूशनसह दिला जाईल. जो 120Hz रिफ्रेश रेटवर चालेल. टॅबलेटमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असेल, ज्यात 13MP चा मेन सेन्सर आणि 8MP चा दुसरा कॅमेरा मिळेल. सोबत 8MP चा फ्रंट कॅमेरा असू शकतो. 

Vivo X Note  

Vivo X Note स्मार्टफोनमध्ये 7-इंचाचा मोठा Samsung AMOLED E5 डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हा एक कर्व एज पंच होल कटआउट असलेला पॅनल असेल. जो Quad HD+ रिजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा सर्वात शक्तिशाली Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर देण्यात येईल. रॅम आणि स्टोरेज देखील साजेशी असेल अशी अपेक्षा आहे.   

Vivo X Note स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात येईल. ज्यात 50-मेगापिक्सल Samsung S5KGN1 सेन्सर मुख्य कॅमेऱ्याचे काम करेल. तर सोबत 48-मेगापिक्सलची Sony IMX598 लेन्स, 12-मेगापिक्सलचा Sony IMX663 सेन्सर आणि 8-मेगापिक्सलचा OV08A10 टेलीफोटो कॅमेरा 5x झूमसह मिळू शकतो. या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी 80W फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळू शकते. विवोचा हा आगामी फ्लॅगशिप फोन मार्चमध्ये जागतिक बाजारात येऊ शकतो.   

Vivo X Fold   

Vivo X Fold मध्ये 6.5 इंचाचा फुल एचडी+ कव्हर डिस्प्ले मिळू शकतो. तर आतमध्ये 8 इंचाचा मोठा डिस्प्ले असेल, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. फोनला Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरची ताकद मिळू शकते. तसेच यातील क्वॉड रियर कॅमेरा सेटअपमध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा, 48MP ची अल्ट्रा-वाईड लेन्स, 12MP ची पोट्रेट लेन्स आणि 8MP ची पेरीस्कोप लेन्स असेल. यातील 4,600mAh ची बॅटरी 80W फास्ट चार्जिंगसह येऊ शकते.   

Web Title: Vivo X Fold Vivo X Note Vivo Pad May Launch On March 28  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.