सर्वांना हवाहवासा वाटेल Vivo X Note स्मार्टफोन; लाँच होण्याआधीच डिजाइन आली समोर
By सिद्धेश जाधव | Published: March 30, 2022 02:56 PM2022-03-30T14:56:07+5:302022-03-30T14:56:53+5:30
Vivo X Note स्मार्टफोनची डिजाईन समोर आली आहे. हा कंपनीचा आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे.
गेले कित्येक दिवस Vivo च्या एका आगामी स्मार्टफोनची चर्चा सुरु आहे. रिपोर्ट्सनुसार कंपनीचा नवीन प्रीमियम स्मार्टफोन Vivo X Note बाजारात येणार आहे. आता कंपनीनं देखील हा स्मार्टफोन सर्वप्रथम चीनमध्ये लाँच करण्यात येईल, असं सांगितलं आहे. येत्या 11 एप्रिलला एका लाँच इव्हेंटमधून विवोच्या फोल्डेबल स्मार्टफोन Vivo X Fold आणि Vivo Pad टॅबलेट सोबत Vivo X Note ची एंट्री होईल.
विवोनं याचा एक टीजर देखील सोशल मीडियावर शेयर केला आहे. या टीजरमुळे लाँच होण्याआधीच स्मार्टफोनच्या के फ्रंट आणि बॅक पॅनलची डिजाइन समजली आहे. तसेच फोनमध्ये वनप्लस प्रमाणे अलर्ट स्लायडरचा वापर केला जाईल, हे देखील टीजरमधून समोर आलं आहे.
Vivo X Note चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
Vivo X Note स्मार्टफोनमध्ये 7-इंचाचा मोठा Samsung AMOLED E5 डिस्प्ले 2K रिजोल्यूशनसह दिला जाऊ शकतो. हा एक कर्व एज पंच होल कटआउट असलेला पॅनल असेल. जो Quad HD+ रिजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा सर्वात शक्तिशाली Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर देण्यात येईल. रॅम आणि स्टोरेज देखील साजेशी असेल अशी अपेक्षा आहे.
Vivo X Note स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात येईल. ज्यात 50-मेगापिक्सल Samsung S5KGN1 सेन्सर मुख्य कॅमेऱ्याचे काम करेल. तर सोबत 48-मेगापिक्सलची Sony IMX598 लेन्स, 12-मेगापिक्सलचा Sony IMX663 सेन्सर आणि 8-मेगापिक्सलचा OV08A10 टेलीफोटो कॅमेरा 5x झूमसह मिळू शकतो. या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी 80W फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळू शकते. विवोचा हा आगामी फ्लॅगशिप फोन मार्चमध्ये जागतिक बाजारात येऊ शकतो.