जबरदस्त प्रोसेसरसह Vivo X60 Pro+ लाँच; पाहा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

By जयदीप दाभोळकर | Published: January 22, 2021 04:37 PM2021-01-22T16:37:26+5:302021-01-22T16:51:47+5:30

पाहा कोणते आहेत जबरदस्त स्पेसिफिकेशन्स

Vivo X60 Pro+ With Snapdragon 888 SoC 55W Fast Charging Support Launched Price Specifications | जबरदस्त प्रोसेसरसह Vivo X60 Pro+ लाँच; पाहा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

जबरदस्त प्रोसेसरसह Vivo X60 Pro+ लाँच; पाहा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Next
ठळक मुद्देया स्मार्टफोनच्या मागील बाजूला चार कॅमेरे देण्यात आले आहे.आतापर्यंतचा सर्वात पॉवरफुल Qualcomm Snapdragon 888 या प्रोसेसरसह हा स्मार्टफोन येतो

स्मार्टफोन तयार करणारी कंपनी विवोनं आपला फ्लॅगशिप मोबाईल Vivo X60 Pro+ लाँच केला आहे. विवोच्या या स्मार्टफोमध्ये आतापर्यंतचा सर्वात पॉवरफुल Qualcomm Snapdragon 888 प्रोसेसर, क्वाड रिअर कॅमरा, उत्तम फोटोग्राफीसाठी GN1 आणि Sony IMX598 सेन्सर, 5G कनेक्टिविटी, 55 वॉट फास्ट चार्जिंगसोबतच 4,200mAh बॅटरीसह अनेक भन्नाट फीचर्स देण्यात आली आहेत. अनेक युझर्स Vivo X60 सीरिजच्या स्मार्टफोनची मोठ्या कालावधीपासून वाट पाहत होते. Classic Orange आणि Phantom Blue या रंगांमध्ये हा स्मार्टफोन बाजारात येणार असून ३० जानेवारीपासून याची विक्री सुरू होणार आहे. 

Vivo X60 Pro+ व्हेरिअंटची किंमत

Vivo X60 Pro+ हा स्मार्टफोन कंपनीनं दोन व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. यामध्ये 8 GB RAM + 128 GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 4,999 युआन म्हणजेच जवळपास 56,399 रुपये आणि 12 GB RAM + 256 GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 5,998 युआन म्हणजेच जवळपास 67,659 रुपये इतकी आहे. विवोचा हा प्रिमिअम स्मार्टफोन Samsung Galaxy S21 Series smartphone आणि iPhone 12 Series च्या मोबाईलना टक्कर देणार आहे. सध्या हा फोन केवळ चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. गेल्या महिन्यातच विवोनं X60 आणि Vivo X60 Pro लाँच केले होते. त्यानंतर पुन्हा एकदा विवोनं हा जबरदस्त स्पेसिफिकेशन्स असलेला फोन लाँच केला आहे.

विवोच्या या फ्लॅगशिप Vivo X60 Pro+ या स्मार्टफोनमध्ये 6.56 इंचाचा Full-HD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. याचं स्क्रिन रिझॉल्युशन 2376×1080 पिक्सेल आहे. तसंच या फोनच्या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. याव्यतिरिक्त हा फोन OriginOS skin बेस्ड Android 11 सोबत येतो. या फोनमध्ये 4,200mAh ची बॅटरी देण्यात आली असून यासोबत 55W फास्ट वायर्ड चार्जिंग फीचर देण्यात आलं आहे. हा फोन पूर्ण चार्ज होण्यासाठी केवळ ४५ मिनिटं लागत असल्याचा दावा कंपनीनं केला आहे.

Vivo X60 Pro+ मध्ये क्वाड रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आलं आहे. यामध्ये 50MP Samsung GN1 प्रायमरी सेन्सर वापरण्यात आला आहे. याव्यतिरिक्त 48MP Sony IMX598 सेन्सरही देण्यात आला आहे. यासोबतच video image stabilization (VIS) देखील मिळतं. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये 2x optical zoom सह 32MP ची टेलिफोटो लेन्स आणि  8MP periscope कॅमेराहीदेण्यात आला असून तो 5x hybrid optical zoom सह येतो.

Web Title: Vivo X60 Pro+ With Snapdragon 888 SoC 55W Fast Charging Support Launched Price Specifications

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.