OnePlus 9 ला थेट टक्कर; Vivo X60 Series भारतात लाँच; वाचा, डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 05:00 PM2021-03-25T17:00:01+5:302021-03-25T17:01:22+5:30

Vivo X60 Series: प्री-बुकिंगसाठी HDFC कार्ड्सची ऑफर देण्यात आली असून, १० टक्क्यांपर्यंत कॅशबॅक दिली जात आहे. 

vivo x60 series launch in india know about specifications and price | OnePlus 9 ला थेट टक्कर; Vivo X60 Series भारतात लाँच; वाचा, डिटेल्स

OnePlus 9 ला थेट टक्कर; Vivo X60 Series भारतात लाँच; वाचा, डिटेल्स

googlenewsNext
ठळक मुद्देVivo X60 सीरिज भारतात लाँचप्री-बुकिंगसाठी HDFC कार्ड्सची ऑफर२ एप्रिलपासून हे स्मार्टफोन्स विक्रीसाठी उपलब्ध

नवी दिल्ली : अत्याधुनिक आणि वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कमी किमतीत जास्त वैशिष्ट्ये असलेले स्मार्टफोन्स ऑफर केले जात आहेत. Redmi, xiomi, samsung, apple, asus यांसारख्या कंपन्यांमध्ये चढाओढ असलेली आपल्याला दिसते. OnePlus 9 ला थेट टक्कर देण्यासाठी Vivo ने X60 ची नवीन सीरिज लाँच केली आहे. (vivo x60 series launch in india know about specifications and price)

Vivo ने Vivo X60, X60 Pro, X60 Pro+ असे उत्तमोत्तम स्मार्टफोन्स भारतात लाँच केले आहेत. या तीनही स्मार्टफोन्सची बुकिंग सुरू झाली असून, २ एप्रिलपासून हे स्मार्टफोन्स विक्रीसाठी उपलब्ध असतील, असे सांगितले जात आहे. प्री-बुकिंगसाठी HDFC कार्ड्सची ऑफर देण्यात आली असून, १० टक्क्यांपर्यंत कॅशबॅक दिली जात आहे. 

Vivo X60 Pro+ स्पेसिफिकेशन

Vivo च्या या स्मार्टफोनमध्ये ६.५६ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी मेमरी देण्यात आली आहे. स्नॅपड्रॅगन ८८८ या लेटेस्ट प्रोसेसर देण्यात आला असून, तीन कॅमेरांचा सेटअप देण्यात आला आहे. ४२०० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरही देण्यात आला आहे. 

Mi, Samsung नाही, तर 'या' कंपनीचा धडाका; ३ दिवसांत २,३०० कोटींची मोबाइल विक्री

Vivo X60 Pro स्पेसिफिकेशन

Vivo च्या या स्मार्टफोनमध्ये ६.५६ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी मेमरी देण्यात आली आहे. ४२०० mAh ची बॅटरी देण्यात आली असून, स्नॅपड्रॅगन ८७० प्रोसेसर चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरही देण्यात आला आहे. 

Vivo X60 स्पेसिफिकेशन

Vivo X60 Pro+ आणि Vivo X60 Pro या प्रमाणेच या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन आणि वैशिष्ट्ये आहेत. मात्र, याला स्नॅपड्रॅगन ८७०SoC प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच याला ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. 

Vivo X60 च्या ८जीबी रॅम+१२८जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरिअंटची किंमत ३७,९९० रुपये आणि १२जीबी रॅम+२५६जीबी इंटरनल व्हेरिअंटची किंमत ४१,९९० रुपये आहे. तसेच X60 प्रो १२जीबी रॅम+२५६जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरिअंटची किंमत ४९,९९० रुपये आहे. तर, X60 प्रो+ सिंगल व्हेरियंट म्हणजेच १२जीबी रॅम+२५६जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरिअंटची किंमत ६९,९९० रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. 
 

Web Title: vivo x60 series launch in india know about specifications and price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.