लई भारी! कमी झाली विवोच्या फ्लॅगशिप स्मार्टफोनची किंमत; जाणून घ्या 12GB रॅम असेलल्या Vivo X60 ची नवीन किंमत 

By सिद्धेश जाधव | Published: August 17, 2021 12:22 PM2021-08-17T12:22:19+5:302021-08-17T12:28:49+5:30

Vivo X60 Price Cut: कंपनीने Vivo X60 ची किंमत 3,000 रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे. ही किंमत ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही माध्यमांवर कमी करण्यात आली आहे.

Vivo x60 smartphone gets price cut in india upto 3000 rs  | लई भारी! कमी झाली विवोच्या फ्लॅगशिप स्मार्टफोनची किंमत; जाणून घ्या 12GB रॅम असेलल्या Vivo X60 ची नवीन किंमत 

लई भारी! कमी झाली विवोच्या फ्लॅगशिप स्मार्टफोनची किंमत; जाणून घ्या 12GB रॅम असेलल्या Vivo X60 ची नवीन किंमत 

googlenewsNext
ठळक मुद्देकंपनीने Vivo X60 ची किंमत 3,000 रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे.ही किंमत ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही माध्यमांवर कमी करण्यात आली आहे. हा फोन ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 870 प्रोसेसरला सपोर्ट करतो.

यावर्षी मार्चमध्ये विवोने आपली Vivo X60 सीरिज भारतात सादर केली होती. या सीरिजमध्ये कंपनीने तीन स्मार्टफोन्स लाँच केले होते. या सीरिजमध्ये कंपनीने Vivo X60, Vivo X60 Pro आणि Vivo X60 Pro Plus असे तीन 5G स्मार्टफोन्स लाँच केले होते. आता कंपनीने या सीरीजमधील विवो एक्स60 ची किंमत कमी केली आहे. विवो एक्स60 च्या नवीन किंमतीची माहिती 91mobiles ने दिली आहे.  

Vivo X60 ची नवीन किंमत 

कंपनीने Vivo X60 ची किंमत 3,000 रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे. ही किंमत ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही माध्यमांवर कमी करण्यात आली आहे. या कपातीनंतर Vivo X60 चा 37,990 रुपयांमध्ये मिळणारा 8GB रॅम व 128GB स्टोरेज व्हेरिएंट आता 34,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर 12GB रॅम व 256GB स्टोरेज व्हेरिएंट 2,000 रुपयांच्या प्राईसकटनंतर 41,990 रुपयांच्या ऐवजी 39,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

हे देखील वाचा: 18GB रॅम, 6,000mAh बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन 888+ प्रोसेसरसह दमदार ASUS ROG Phone 5S लाँच

Vivo X60 चे स्पेसिफिकेशन 

Vivo X60 मध्ये 6.56 इंचाचा फुल-एचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 870 प्रोसेसरला सपोर्ट करतो. या फोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 48MP चा मुख्य कॅमेरा फोर ऍक्सिस ऑप्टिकल इमेज स्टेब्लाइजेशनसह देण्यात आला आहे. त्याचबरोबर 13MP ची अल्ट्रा-वाईड लेन्स आणि 13MP पोट्रेट लेन्स देण्यात आली आहे. हा फोन 32MP फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. एक्स 60 मध्ये 4,300mAh ची बॅटरी 33 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह देण्यात आली आहे.  

Web Title: Vivo x60 smartphone gets price cut in india upto 3000 rs 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.