खास कॅमेरा सिस्टमसह सादर होणार Vivo X70 Pro+; पुढील आठवड्यात होऊ शकतो लाँच
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 03:42 PM2021-09-01T15:42:49+5:302021-09-01T15:43:40+5:30
Vivo X70 Pro Plus Camera: एका चीनी टिपस्टरने आगामी Vivo X70 Pro+ च्या कॅमेरा सेगमेंटची माहिती दिली आहे.
विवो नेहमीच आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोनच्या कॅमेरा सेगमेंटमध्ये प्रयोग करत असते. कंपनीने भारतात पहिला पॉपअप कॅमेरा असलेला स्मार्टफोन देखील सादर केला होता. आता विवो आपली नवीन X70 सीरीज लाँच करणार आहे. ही सीरिज 9 सप्टेंबरला चीनमध्ये सादर करण्यात येईल. या सीरीजमध्ये Vivo X70, Vivo X70 Pro आणि Vivo X70 Pro+ असे तीन स्मार्टफोन सादर केले जातील. यातील Vivo X70 Pro+ डिवाइसच्या कॅमेरा फीचर्सची माहिती आता समोर आली आहे.
Vivo X70 Pro+ मधील कॅमेरा सिस्टम
GizmoChina ने दिलेल्या माहितीनुसार Vivo X70 Pro+ मध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप देण्यात येईल. यातील एक सेन्सर OIS म्हणजे ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशनला सपोर्ट करेल. हा एक 50 मेगापिक्सलचा मुख्य Samsung GN1 सेन्सर असेल. त्याचबरोबर एक 48 मेगापिक्सलची Sony IMX598 सुपरवाईड लेन्स देण्यात येईल, जी मायक्रो गिम्बल स्टेबिलाइजेशनसह सादर करण्यात येईल. तसेच या फोनमधील 12 मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स 2x ऑप्टिकल झूम आणि OIS सपोर्टसह सादर करण्यात येईल. शेवटचा आणि चौथा कॅमेरा OIS सपोर्ट असलेला 8 मेगापिक्सलचा पेरिस्कोप झूम कॅमेरा असेल, जो 5x ऑप्टिकल झूम आणि 60x डिजिटल झूमला सपोर्ट करेल.
Vivo X70 Pro+ चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
Vivo X70 Pro+ स्मार्टफोन या सीरीजमधील सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन असेल. या फोनमध्ये 6.78-इंचाचा डिस्प्ले मिळेल. हा डिस्प्ले 10-bit स्क्रीन, 2K रिजोल्यूशन आणि 120Hz LTPO रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉमचा लेटेस्ट Snapdragon 888 Plus प्रोसेसर दिला जाऊ शकतो. या फोनमधील 4500mAh ची बॅटरी आणि 55W फास्ट वायर्ड आणि 50W फास्ट वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करेल. फोन धूळ आणि पाण्यापासून वाचण्यासाठी IP68 रेटिंगसह सादर केला जाईल. या फोनमधील रियर कॅमेरा सेटअपमध्ये 50MP Samsung GN1 सेन्सर, 48MP IMX598 सेन्सर, 12MP कॅमेरा आणि 5x ऑप्टिकल झूम सपोर्टसह 8MP चा पेरिस्कोप कॅमेरा देण्यात येईल.