आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट! 32MP चा सेल्फी कॅमेरा असलेला Vivo X70 Pro पुन्हा इतक्या स्वस्तात मिळणार नाही 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 06:09 PM2022-02-18T18:09:55+5:302022-02-18T18:10:38+5:30

Vivo X70 Pro Offers: गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये आलेला Vivo X70 Pro स्मार्टफोन आता स्वस्तात विकत घेता येत आहे. यासाठी तुम्हाला फ्लिपकार्टवरून याची खरेदी करावी लागेल.

Vivo X70 Pro Gets Price Cut On Flipkart Check Offers And Price  | आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट! 32MP चा सेल्फी कॅमेरा असलेला Vivo X70 Pro पुन्हा इतक्या स्वस्तात मिळणार नाही 

आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट! 32MP चा सेल्फी कॅमेरा असलेला Vivo X70 Pro पुन्हा इतक्या स्वस्तात मिळणार नाही 

Next

Vivo X70 Pro स्मार्टफोनची किंमत लाँचनंतर पहिल्यांदाच कमी करण्यात आली आहे. या कपातीनंतर हा फोन Flipkart वर उपलब्ध झाला आहे. एक्सचेंज ऑफर, फ्लॅट डिस्काउंट आणि बँक ऑफर्सनंतर या फोनची किंमत खूपच कमी होते. जर तुम्ही 32MP सेल्फी कॅमेरा, 12GB RAM आणि 44W फास्ट चार्जिंग, असे दमदार फीचर्स असलेला स्मार्टफोन शोधत असाल तर तुम्ही Vivo X70 Pro ची निवड करू शकता.  

Vivo X70 Pro ची किंमत आणि ऑफर्स 

Vivo X70 Pro स्मार्टफोनच्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 51,990 रुपये आहे. परंतु 9 टक्के डिस्काउंटनंतर हा फोन 46,990 मध्ये उपलब्ध झाला आहे. या फोनची खरेदी SBI आणि ICICI क्रेडिट व डेबिट कार्डनं केल्यास 4,000 रुपयांची सूट मिळे. तसेच जुना फोन देऊन तुम्ही 15,500 रुपयांपर्यंतची बचत करू शकता. म्हणजे हा दमदार फोन फक्त 34,490 रुपयांमध्ये घरी नेता येईल. फ्लिपकार्ट हा फोन फक्त 1,733 रुपयांच्या हप्त्यावर विकत घेण्याचा पर्याय देत आहे.  

Vivo X70 Pro चे स्पेसिफिकेशन्स   

Vivo X70 Pro स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला 6.56-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आहे. या फोनमध्ये कंपनीने MediaTek Dimensity 1200 चिपसेटचा वापर केला आहे. या प्रोसेसरला 12GB पर्यंतच्या रॅम आणि 256GB स्टोरेजची जोड देण्यात आली आहे. हा फोन Android 11 आधारित FuntouchOS वर चालतो. अ‍ॅमोलेड डिस्प्ले असल्यामुळे या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो.      

Vivo X70 Pro स्मार्टफोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP चा मुख्य कॅमेरा आहे जो OIS, गिंबल स्टेबलाइजेशन 3.0 टेक्नॉलॉजी, Zeiss ऑप्टिक्स आणि Zeiss T* कोटिंगसह सादर करण्यात आला आहे. त्याचबरोबर 12MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स, 12 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 5X झूम देणारी 8 मेगापिक्सलचा पेरिस्कोप कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. हा फोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये 5G, 4G LTE, ड्युअल-बँड Wi-Fi, Bluetooth 5.1, GPS, आणि USB Type-C पोर्ट असे ऑप्शन्स मिळतात. या विवो फोनमधील 4,450mAh ची बॅटरी 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. 

हे देखील वाचा:

Web Title: Vivo X70 Pro Gets Price Cut On Flipkart Check Offers And Price 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.