Vivo X70 Pro आणि X70 Pro Plus ची किंमत लीक; भारतातील लाँच डेटचा देखील खुलासा 

By सिद्धेश जाधव | Published: July 30, 2021 06:40 PM2021-07-30T18:40:08+5:302021-07-30T18:41:03+5:30

विवो आपल्या Vivo X70 सीरीजमध्ये Vivo X70, Vivo X70 Pro आणि Vivo X70 Pro Plus लाँच करणार आहे.  

Vivo x70 pro plus price in india september launch date  | Vivo X70 Pro आणि X70 Pro Plus ची किंमत लीक; भारतातील लाँच डेटचा देखील खुलासा 

Vivo X70 Pro आणि X70 Pro Plus ची किंमत लीक; भारतातील लाँच डेटचा देखील खुलासा 

googlenewsNext

विवो लवकरच आपली फ्लॅगशिप Vivo X70 सीरीज लवकरच लाँच करू शकते. रिपोर्ट्सनुसार IPL 2021 च्या दुसऱ्या टप्प्याची सुरवात झाल्यावर ही सीरिज सादर होऊ शकते. या सीरिजमध्ये Vivo X70, Vivo X70 Pro आणि X70 Pro Plus असे तीन स्मार्टफोन सप्टेंबरमध्ये लाँच केले जाऊ शकतात, अशी माहिती 91मोबाईल्सने विवो कंपनीच्या अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिली आहे.  

Vivo X70 Pro आणि X70 Pro Plus ची भारतातील किंमत  

रिपोर्ट्सनुसार विवो एक्स 70 प्रो स्मार्टफोन 50,000 रुपयांच्या आसपास लाँच केला जाऊ शकतो. तर Vivo X70 Pro Plus ची किंमत 70,000 रुपयांच्या आसपास असेल. Vivo X70 ची किंमत मात्र समोर आली नाही, परंतु हा फोन 50 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत लाँच केला जाऊ शकतो, असे दिसत आहे.  

Vivo X70 संभाव्य स्पेसिफिकेशन्स 

Vivo X70 स्मार्टफोनमध्ये f/1.15 अपर्चरची लेन्स मिळेल, अशी माहिती लीकमधून समोर आली आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये 5-अ‍ॅक्सिस इमेज स्टेब्लाइजेशन मिळेल. जर हे खरे ठरले तर विवो एक्स 70 या फीचर्ससह येणारा पहिला स्मार्टफोन असेल. फोनमध्ये Zeiss optics ची ब्रँडिंग मिळू शकते. 

या फोनमध्ये Samsung E4 डिस्प्ले असल्याची देखील माहिती समोर आली आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि FHD+ रिजोल्यूशनला सपोर्ट करेल. Vivo X70 स्मार्टफोन पंच होल डिजाइन आणि गोरिल्ला ग्लास 6 प्रोटेक्शनसह बाजारात येऊ शकतो. तसेच या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 888 प्रोसेसर मिळू शकतो. या डिवाइसमध्ये 4500mAh ची बॅटरी 66W फास्ट चार्जिंग सपोर्टसह सादर केली जाईल. 

Web Title: Vivo x70 pro plus price in india september launch date 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.