शानदार कॅमेरा सेटअप, फ्लॅगशिप प्रोसेसरसह Vivo X70 Pro+ सादर; शाओमी-वनप्लसला देणार का टक्कर? 

By सिद्धेश जाधव | Published: September 10, 2021 01:11 PM2021-09-10T13:11:02+5:302021-09-10T13:14:52+5:30

Vivo X70 Pro Plus Specifications: विवोच्या एक्स सीरिजमधील Vivo X70 Pro Plus सर्वात पॉवरफुल स्मार्टफोन आहे. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 888 Plus SoC चा वापर करण्यात आला आहे.

vivo x70 pro plus smartphones launched in china with snapdragaon 888 plus soc  | शानदार कॅमेरा सेटअप, फ्लॅगशिप प्रोसेसरसह Vivo X70 Pro+ सादर; शाओमी-वनप्लसला देणार का टक्कर? 

शानदार कॅमेरा सेटअप, फ्लॅगशिप प्रोसेसरसह Vivo X70 Pro+ सादर; शाओमी-वनप्लसला देणार का टक्कर? 

googlenewsNext
ठळक मुद्देVivo X70 Pro Plus स्मार्टफोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. चारही कॅमेरे ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशनला सपोर्ट करतात

Vivo X70, Vivo X70 Pro, आणि Vivo X70 Pro Plus असे तीन फ्लॅगशिप स्मार्टफोन चीनमध्ये लाँच झाले आहेत. या तिन्ही स्मार्टफोन्समधील Vivo X70 Pro Plus सर्वात पॉवरफुल स्मार्टफोन आहे. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 888 Plus SoC चा वापर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या स्मार्टफोनमधील चारही रियर कॅमेरे ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशनला सपोर्ट करतात. त्यामुळे फोटो किंवा व्हिडीओ कॅप्चर करताना स्मार्टफोन डगमगला तरीही फोटो ब्लर होणार नाहीत आणि व्हिडीओ देखील स्मूदली रेकॉर्ड होईल.  

Vivo X70 Pro Plus Specifications

Vivo X70 Pro Plus मध्ये 6.78-इंचाचा QHD+ Samsung E5 AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. 120Hz रिफ्रेश रेटसह येणारा हा फोन कॉर्निग गोरिल्ला ग्लासच्या सुरक्षेसह सादर करण्यात आला आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉमचा लेटेस्ट फ्लॅगशिप स्नॅपड्रॅगन 888 प्लस प्रोसेसर मिळतो. ज्याला Adreno 660 GPU ची जोड देण्यात आली आहे. हा फोन 12GB पर्यंतच्या रॅम आणि 512GB स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Android 11 आधारित OriginOS वर चालतो. यातील 4500mAh ची बॅटरी 55W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये 5G, 4G LTE, ड्युअल बँड Wi-Fi, Bluetooth 5.1, GPS, आणि USB Type-C पोर्ट असे ऑप्शन्स मिळतात.  

Vivo X70 Pro Plus स्मार्टफोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यातील मुख्य कॅमेरा 50MP चा Samsung GN1 सेन्सर आहे. त्याचबरोबर 48MP IMX598 अल्ट्रा वाईड सेन्सर गिम्बल स्टॅबिलायजेशनसह मिळतो. सोबत 12MP डेप्थ सेन्सर आणि 8MP चा टेलीफोटो कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो. हे चारही रियर कॅमेरे ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशनला सपोर्ट करतात, अश्या कॅमेरा सेटअपसह येणारा हा पहिलाच स्मार्टफोन असावा.  

Vivo X70 Pro Plus ची किंमत  

Vivo X70 Pro Plus स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट चीनमध्ये उपलब्ध होतील. यातील 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 5,499 RMB (सुमारे 62,700 रुपये) ठेवण्यात आली आहे. तसेच या फोनच्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 5,999 RMB (सुमरे 68,400 रुपये) आणि 12GB रॅम आणि 512GB व्हेरिएंट 6,999 RMB (सुमरे 79800 रुपये) ठेवण्यात आली आहे. लवकरच हा फोन भारतात देखील सादर होण्याची शक्यता आहे.  

Web Title: vivo x70 pro plus smartphones launched in china with snapdragaon 888 plus soc 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.