धमाकेदार स्पेसिफिकेशनसह शक्तिशाली Vivo X70 Pro स्मार्टफोन आला भारतीयांच्या भेटीला 

By सिद्धेश जाधव | Published: September 30, 2021 05:23 PM2021-09-30T17:23:39+5:302021-09-30T17:24:00+5:30

Vivo X70 Pro Price In India: Vivo X70 Pro स्मार्टफोन मीडियाटेक प्रोसेसर, 12GB रॅम 50MP गिम्बल कॅमेरा आणि 44W फास्ट चार्जिंगसह बाजारात दाखल झाला आहे.

Vivo x70 pro smartphone launched with 50mp quad rear camera 32mp selfie camera  | धमाकेदार स्पेसिफिकेशनसह शक्तिशाली Vivo X70 Pro स्मार्टफोन आला भारतीयांच्या भेटीला 

धमाकेदार स्पेसिफिकेशनसह शक्तिशाली Vivo X70 Pro स्मार्टफोन आला भारतीयांच्या भेटीला 

Next

विवोने आपली बहुप्रतीक्षित फ्लॅगशिप X70 Series देशात सादर केली आहे. काही दिवसांपूर्वी चीनमध्ये या सीरिजचे तीन स्मार्टफोन कंपनीने सादर केले होते. यातील Vivo X70 Pro आणि Vivo X70 Pro Plus हे दोन फोन भारतात सादर करण्यात आले आहेत. या लेखात आपण Vivo X70 Pro च्या स्पेक्स, किंमत आणि फीचर्सची माहिती घेणार आहोत.  

Vivo X70 Pro चे स्पेसिफिकेशन्स  

Vivo X70 Pro स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला 6.56-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आहे. या फोनमध्ये कंपनीने MediaTek Dimensity 1200 चिपसेटचा वापर केला आहे. या प्रोसेसरला 12GB पर्यंतच्या रॅम आणि 256GB स्टोरेजची जोड देण्यात आली आहे. हा फोन Android 11 आधारित FuntouchOS वर चालतो. अ‍ॅमोलेड डिस्प्ले असल्यामुळे या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो.     

Vivo X70 Pro स्मार्टफोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP चा मुख्य कॅमेरा आहे जो OIS, गिंबल स्टेबलाइजेशन 3.0 टेक्नॉलॉजी, Zeiss ऑप्टिक्स आणि Zeiss T* कोटिंगसह सादर करण्यात आला आहे. त्याचबरोबर 12MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स, 12 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 5X झूम देणारी 8 मेगापिक्सलचा पेरिस्कोप कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. हा फोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये 5G, 4G LTE, ड्युअल-बँड Wi-Fi, Bluetooth 5.1, GPS, आणि USB Type-C पोर्ट असे ऑप्शन्स मिळतात. या विवो फोनमधील 4,450mAh ची बॅटरी 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.     

Vivo X70 Pro ची किंमत 

Vivo X70 Pro चे तीन व्हेरिएंट भारतात सादर करण्यात आले आहेत. या फोनचा 8GB RAM आणि 128GB व्हेरिएंट 46,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 8GB RAM आणि 256GB व्हेरिएंट 49,990 रुपये आणि 12GB RAM आणि 256GB व्हेरिएंटची किंमत 52,990 रुपये ठेवण्यात आली आहे. आजपासून हा फोन प्री बुक करता येईल आणि Vivo X70 Pro ची विक्री 7 ऑक्टोबरपासून कंपनीच्या अधिकृत वेबसाईट, फ्लिपकार्ट आणि ऑफलाइन रिटेल स्टोरवरून सुरु होईल.  

Web Title: Vivo x70 pro smartphone launched with 50mp quad rear camera 32mp selfie camera 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.