IPL 2021 च्या दुसऱ्या टप्प्यादरम्यान Vivo ची ‘ही’ शक्तिशाली सीरिज होणार भारतात सादर  

By सिद्धेश जाधव | Published: September 16, 2021 07:02 PM2021-09-16T19:02:45+5:302021-09-16T19:03:03+5:30

Vivo X70 India launch: Vivo X70 सीरीजच्या भारतीय लाँचची तारीख लीक झाली आहे. 30 सप्टेंबरला या सीरिजमधील दोन स्मार्टफोन भारतीयांच्या भेटीला येऊ शकतात.  

Vivo x70 series launch date in india tipped on 30 september only two models vivo x70 pro and vivo x70 pro plus could launch  | IPL 2021 च्या दुसऱ्या टप्प्यादरम्यान Vivo ची ‘ही’ शक्तिशाली सीरिज होणार भारतात सादर  

प्रतीकात्मक फोटो.

Next

Vivo X70 Series चीनमध्ये 9 सप्टेंबरला सादर करण्यात आली आहे. या सीरीज Vivo X70, Vivo X70 Pro, आणि Vivo X70 Pro+ असे दमदार स्मार्टफोन्स कंपनीने सादर केले आहेत. तेव्हापासून भारतातील विवोचे चाहते या स्मार्टफोन्सची वाट बघत आहेत. आधी आलेले लिक्सला नव्या माहितीने दुजोरा दिला आहे. विवो X70  सीरिज भारतात 30 सेप्टेंबरला सादर केली जाईल.  

लीकनुसार चीनी कंपनी Vivo X70 सीरीजचे फक्त दोन मॉडेलच भारतात 30 सप्टेंबरला लाँच करण्यात येतील. टिप्सटर योगेश बरारने ट्वीट करून सांगितले आहे कि, Vivo X70 सीरीज भारतीय बाजारात 30 सप्टेंबरला लाँच केली जाईल. याआधी देखील आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यात हे फोन्स देशात सादर होतील अशी माहिती आली होती. या सीरीजमधील Vivo X70 Pro आणि Vivo X70 Pro+ मॉडेल भारतात येतील अशी माहिती मनीकंट्रोलने दिली आहे.  

Vivo X70 Pro Plus चे स्पेसिफिकेशन   

Vivo X70 Pro Plus मध्ये 6.78-इंचाचा QHD+ Samsung E5 AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. 120Hz रिफ्रेश रेटसह येणारा हा फोन कॉर्निग गोरिल्ला ग्लासच्या सुरक्षेसह सादर करण्यात आला आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉमचा लेटेस्ट फ्लॅगशिप स्नॅपड्रॅगन 888 प्लस प्रोसेसर मिळतो. ज्याला Adreno 660 GPU ची जोड देण्यात आली आहे. हा फोन 12GB पर्यंतच्या रॅम आणि 512GB स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Android 11 आधारित OriginOS वर चालतो. यातील 4500mAh ची बॅटरी 55W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये 5G, 4G LTE, ड्युअल बँड Wi-Fi, Bluetooth 5.1, GPS, आणि USB Type-C पोर्ट असे ऑप्शन्स मिळतात.    

Vivo X70 Pro Plus स्मार्टफोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यातील मुख्य कॅमेरा 50MP चा Samsung GN1 सेन्सर आहे. त्याचबरोबर 48MP IMX598 अल्ट्रा वाईड सेन्सर गिम्बल स्टॅबिलायजेशनसह मिळतो. सोबत 12MP डेप्थ सेन्सर आणि 8MP चा टेलीफोटो कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो. हे चारही रियर कॅमेरे ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशनला सपोर्ट करतात, अश्या कॅमेरा सेटअपसह येणारा हा पहिलाच स्मार्टफोन असावा.    

Vivo X70 Pro चे स्पेसिफिकेशन्स  

Vivo X70 Pro स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला 6.56-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आहे. या फोनमध्ये कंपनीने सॅमसंगच्या Exynos 1080 चिपसेटचा वापर केला आहे. या प्रोसेसरला 12GB पर्यंतच्या रॅम आणि 512GB स्टोरेजची जोड देण्यात आली आहे. हा फोन Android 11 आधारित OriginOS वर चालतो. अ‍ॅमोलेड डिस्प्ले असल्यामुळे या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो.   

Vivo X70 Pro स्मार्टफोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP चा मुख्य कॅमेरा, 12MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स, 12 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 8 मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. हा फोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये 5G, 4G LTE, ड्युअल-बँड Wi-Fi, Bluetooth 5.1, GPS, आणि USB Type-C पोर्ट असे ऑप्शन्स मिळतात. या विवो फोनमधील 4,450mAh ची बॅटरी 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.   

Web Title: Vivo x70 series launch date in india tipped on 30 september only two models vivo x70 pro and vivo x70 pro plus could launch 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.