विवोच्या स्मार्टफोन्समध्ये मिळणार सॅमसंगचा प्रोसेसर; तीन स्मार्टफोन्ससह येणार Vivo X70 सीरीज 

By सिद्धेश जाधव | Published: August 30, 2021 03:43 PM2021-08-30T15:43:01+5:302021-08-30T15:46:37+5:30

Vivo X70 Series: या सीरिजचे तीन स्मार्टफोन Vivo X70, Vivo X70 Pro, आणि Vivo X70 Pro+ सर्वप्रथम चीनमध्ये सादर केले जाऊ शकतात. या तिन्ही फ्लॅगशिप स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स लाँचच्या आधी लीक झाले आहेत.

Vivo x70 series smartphones will be launched with exynos 1080 processor  | विवोच्या स्मार्टफोन्समध्ये मिळणार सॅमसंगचा प्रोसेसर; तीन स्मार्टफोन्ससह येणार Vivo X70 सीरीज 

विवोच्या स्मार्टफोन्समध्ये मिळणार सॅमसंगचा प्रोसेसर; तीन स्मार्टफोन्ससह येणार Vivo X70 सीरीज 

Next
ठळक मुद्देया सीरिजचे तीन स्मार्टफोन Vivo X70, Vivo X70 Pro, आणि Vivo X70 Pro+ सर्वप्रथम चीनमध्ये सादर केले जाऊ शकतात. Vivo X70 Pro+ स्मार्टफोन या सीरीजमधील सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन असेल

चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी विवोची फ्लॅगशिप Vivo X70 सीरीज पुढील महिन्यात ग्राहकांच्या भेटीला येईल. कंपनीने या सीरिजची कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. परंतु या सीरिजचे तीन स्मार्टफोन Vivo X70, Vivo X70 Pro, आणि Vivo X70 Pro+ सर्वप्रथम चीनमध्ये सादर केले जाऊ शकतात. या तिन्ही फ्लॅगशिप स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स लाँचच्या आधी लीक झाले आहेत. लिक्सटर Bald Panda ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वीबोवर ही माहिती दिली आहे.  

Vivo X70 

Vivo X70 स्मार्टफोनमध्ये 6.56-इंचाचा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट दिला जाऊ शकतो. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 1080p असेल. या स्मार्टफोनचे दोन व्हर्जन बाजारात येऊ शकतात. एक मीडियाटेकच्या Dimensity 1200 प्रोसेसरसह येईल, तर दुसऱ्या व्हर्जनमध्ये सॅमसंगचा Exynos 1080 प्रोसेसर मिळू शकतो. फोनच्या मागे 40MP चा मुख्य कॅमेरा, 12MP चे दोन कॅमेरे आणि एक 13MP चा कॅमेरा सेन्सर आलेला क्वॉड कॅमेरा सेटअप मिळेल. Vivo X70 स्मार्टफोनमधील 4400mAh ची बॅटरी 44W फास्ट चार्जसह मिळेल. त्याचबरोबर या फोनमध्ये Z-axis मोटर, सिंगल पंच होल आणि इंफ्रारेड स्कॅनर दिला जाऊ शकतो.  

Vivo X70 Pro 

Vivo X70 Pro स्मार्टफोनमधील डिस्प्ले आणि बॅटरी स्पेसीफाकेशन्स Vivo X70 सारखे असतील. या Vivo स्मार्टफोनमध्ये सॅमसंगचा Exynos 1080 प्रोसेसर मिळू शकतो. या फोनमधील क्वॉड रियर कॅमेरा सेटअपमध्य 50MP चा मुख्य कॅमेरा, 12MPसेन्सर, 13MP सेन्सर आणि 5x ऑप्टिकल झूम असलेला 8MP पेरिस्कोप कॅमेरा मिळू शकतो.  

Vivo X70 Pro+ 

Vivo X70 Pro+ स्मार्टफोन या सीरीजमधील सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन असेल. या फोनमध्ये 6.78-इंचाचा डिस्प्ले मिळेल. हा डिस्प्ले 10-bit स्क्रीन, 2K रिजोल्यूशन आणि 120Hz LTPO रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉमचा लेटेस्ट Snapdragon 888 Plus प्रोसेसर दिला जाऊ शकतो. या फोनमधील 4500mAh ची बॅटरी आणि 55W फास्ट वायर्ड आणि 50W फास्ट वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करेल. फोन धूळ आणि पाण्यापासून वाचण्यासाठी IP68 रेटिंगसह सादर केला जाईल. या फोनमधील रियर कॅमेरा सेटअपमध्ये 50MP Samsung GN1 सेन्सर, 48MP IMX598 सेन्सर, 12MP कॅमेरा आणि 5x ऑप्टिकल झूम सपोर्टसह 8MP चा पेरिस्कोप कॅमेरा देण्यात येईल.  

Web Title: Vivo x70 series smartphones will be launched with exynos 1080 processor 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.