लाँच होण्याआधी शक्तिशाली Vivo X70 सीरीजचे दोन मॉडेल वेबसाईटवर लिस्ट; जाणून घ्या वैशिष्ट्ये
By सिद्धेश जाधव | Published: September 4, 2021 12:29 PM2021-09-04T12:29:21+5:302021-09-04T12:30:20+5:30
Vivo X70 Series Launch: Vivo X70 सीरिजमधील दोन स्मार्टफोन मॉडेल नंबर V2132A आणि V2133A सह टेनावर लिस्ट करण्यात आले आहेत.
गेले कित्येक दिवस लिक्स आणि लिस्टिंग्स मधून समोर आलेली Vivo ची आगामी फ्लॅगशिप सीरीज Vivo X70 येत्या 9 सप्टेंबरला लाँच होणार आहे. सर्वप्रथम चीनमध्ये ही सीरिज सादर होईल, त्यानंतर आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्या दरम्यान ही सीरिज भारतात देखील येऊ शकते. परंतु अधिकृत लाँचपूर्वी Vivo X70 सीरिजमधील दोन स्मार्टफोन सर्टिफिकेशन साईट TENNA वर स्पेसिफिकेशन्ससह दिसले आहेत.
Vivo X70 सीरिजमधील दोन स्मार्टफोन मॉडेल नंबर V2132A आणि V2133A सह टेनावर लिस्ट करण्यात आले आहेत. या दोन्ही स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्समध्ये चिपसेट व्यतिरिक इतर कोणताही फरक दिसत नाही. V2132A मॉडेल नंबरसह लिस्ट झालेल्या स्मार्टफोनमध्ये 2.8GHz ऑक्टकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. तर मॉडेल नंबर V2133A असलेला फोन 3.0GHz ऑक्टकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. V2132A मॉडेलमध्ये सॅमसंगचा Exynos प्रोसेसर मिळू शकतो, जो Vivo X70 Pro नावाने बाजारात येईल. लिस्टिंगमधील V2132A स्मार्टफोन Dimensity 1200 SoC चिपसेट आणि Vivo X70 नावाने सादर केला जाऊ शकतो.
Vivo X70 सीरिज स्पेसिफिकेशन्स
TENNA लिस्टिंगनुसार हे दोन्ही फोन 6.58-इंचाच्या AMOLED डिस्प्लेसह सादर करण्यात येतील. या डिस्प्लेमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर मिळू शकतो. हा डिस्प्ले 1080×2376 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करेल. दोन्ही स्मार्टफोनमध्ये 4,320mAh ची बॅटरी देण्यात येईल, जी 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.
Vivo X70 Pro स्मार्टफोनमध्ये 2.8GHz octa-core प्रोसेसर आणि Exynos 1080 SoC सह तीन रॅम व्हेरिएंट उपलब्ध होतील. ज्यात 6GB, 8GB आणि 12GB चा समावेश असले. तर 3.0GHz octa-core प्रोसेसर आणि Dimensity 1200 सह येणार Vivo X70 स्मार्टफोन 8GB आणि 12GB रॅम सह सादर केला जाऊ शकतो. दोन्ही फोन 128GB, 256GB, आणि 512GB स्टोरेज ऑप्शन आणि Android 11 सह बाजारात येतील.
TENNA लिस्टिंगमधून Vivo X70 Pro आणि Vivo X70 स्मार्टफोन्समधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपची माहिती मिळाली आहे. हे फोन 40MP, 12MP, आणि 12MP रिजोल्यूशन असलेल्या रियर कॅमेरा सेटअपसह बाजारात दाखल होतील. तसेच सेल्फीसाठी 32MP चा कॅमेरा मिळेल. या सीरिजमधील टॉप एन्ड Vivo X70 Pro+ स्मार्टफोनमध्ये Zeiss T* कॅमेरा लेन्स मिळेल.