12GB रॅम, 50MP कॅमेऱ्यासह दमदार Vivo X70 आणि Vivo X70 Pro स्मार्टफोन लाँच 

By सिद्धेश जाधव | Published: September 10, 2021 12:31 PM2021-09-10T12:31:15+5:302021-09-10T12:34:50+5:30

Vivo X70 and Vivo X70 Pro Launch: Vivo X70 स्मार्टफोन MediaTek Dimensity 1200 SoC तर VivoX70 Pro स्मार्टफोन सॅमसंग के Exynos 1080 चिपसेटसह सादर करण्यात आला आहे.  

Vivo x70 vivo x70 pro plus smartphones launched in china   | 12GB रॅम, 50MP कॅमेऱ्यासह दमदार Vivo X70 आणि Vivo X70 Pro स्मार्टफोन लाँच 

12GB रॅम, 50MP कॅमेऱ्यासह दमदार Vivo X70 आणि Vivo X70 Pro स्मार्टफोन लाँच 

googlenewsNext
ठळक मुद्देVivo X70 Pro स्मार्टफोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहेVivo X70 स्मार्टफोन कंपनीने तीन व्हेरिएंटमध्ये सादर केला आहे.

विवोने आपली फ्लॅगशिप सीरिज आपल्या होम मार्केट चीनमध्ये सादर केली आहे. कंपनीने Vivo X70, Vivo X70 Pro, आणि Vivo X70 Pro Plus स्मार्टफोन लाँच केले आहेत. आधीच्या Vivo X60 लाइनअपची जागा घेणारे हे स्मार्टफोन्स लवकरच भारतात देखील सादर केले जाऊ शकतात. Vivo X70 स्मार्टफोन MediaTek Dimensity 1200 SoC तर VivoX70 Pro स्मार्टफोन सॅमसंग के Exynos 1080 चिपसेटसह सादर करण्यात आला आहे.  

Vivo X70 आणि Vivo X70 Pro ची किंमत 

Vivo X70 स्मार्टफोन कंपनीने तीन व्हेरिएंटमध्ये सादर केला आहे. या स्मार्टफोनचा छोटा 8GB रॅम व 128GB स्टोरेज व्हेरिएंट 3,699 RMB (सुमारे 42,200 रुपये) मध्ये सादर करण्यात आला आहे. तर 8GB रॅम व 256GB स्टोरेज मॉडेल 3,999 RMB (सुमारे 45,300रुपये) आणि 12GB रॅम व 256GB स्टोरेज व्हेरिएंट 4,299 RMB (सुमारे 49,000 रुपये) मध्ये सादर केला गेला आहे. 

Vivo X70 Pro चे दोन व्हेरिएंट बाजारात उपलब्ध होणार आहेत. या फोनचा बेस व्हेरिएंट 8GB रॅम + 128GB स्टोरेजसह सादर केला गेला आहे. या मॉडेलसाठी 4,299 RMB (सुमारे 49000 रुपये) आणि 8GB रॅम व 256GB स्टोरेज व्हेरिएंट 4,599 RMB (सुमारे 52400 रुपये) इतकी किंमत मोजावी लागेल.  

Vivo X70 चे स्पेसिफिकेशन्स 

Vivo X70 स्मार्टफोनमध्ये 6.56-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. प्रोसेसिंगसाठी या विवो स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 1200 चिपसेट मिळतो. तसेच यात 12GB पर्यंत रॅम आणि 256GB स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन Android 11 वर आधारित OriginOS वर चालतो. या फोनमधील 4,400mAh ची बॅटरी 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

Vivo X70 स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. यात 40MP चा मुख्य सेन्सर, 12MP अल्ट्रा वाईड अँगल सेन्सर आणि 12MP पोर्टेड सेन्सर देण्यात आला आहे. विवोच्या या फोनमध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. कनेक्टिविटीसाठी या फोनमध्ये 5G, 4G LTE, ड्युअल-बँड Wi-Fi, Bluetooth 5.1, GPS, आणि USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे. सिक्योरिटीसाठी हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करतो.  

Vivo X70 Pro चे स्पेसिफिकेशन्स 

Vivo X70 Pro स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला 6.56-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आहे. या फोनमध्ये कंपनीने सॅमसंगच्या Exynos 1080 चिपसेटचा वापर केला आहे. या प्रोसेसरला 12GB पर्यंतच्या रॅम आणि 512GB स्टोरेजची जोड देण्यात आली आहे. हा फोन Android 11 आधारित OriginOS वर चालतो. अ‍ॅमोलेड डिस्प्ले असल्यामुळे या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो.  

Vivo X70 Pro स्मार्टफोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP चा मुख्य कॅमेरा, 12MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स, 12 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 8 मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. हा फोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये 5G, 4G LTE, ड्युअल-बँड Wi-Fi, Bluetooth 5.1, GPS, आणि USB Type-C पोर्ट असे ऑप्शन्स मिळतात. या विवो फोनमधील 4,450mAh ची बॅटरी 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

Web Title: Vivo x70 vivo x70 pro plus smartphones launched in china  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.