iPhone 13 शी पंगा घेण्यासाठी आले Vivo X80 आणि X80 Pro 5G; किंमत मात्र कमी  

By सिद्धेश जाधव | Published: May 18, 2022 03:44 PM2022-05-18T15:44:05+5:302022-05-18T15:44:24+5:30

Vivo X80 स्मार्टफोनचा 8GB रॅम व 128GB मॉडेलची किंमत 54,999 रुपये आणि 12GB रॅम व 256GB मॉडेलची किंमत 59,999 रुपये आहे.

Vivo X80 And Vivo X80 Pro Launched In India Price Specifications  | iPhone 13 शी पंगा घेण्यासाठी आले Vivo X80 आणि X80 Pro 5G; किंमत मात्र कमी  

iPhone 13 शी पंगा घेण्यासाठी आले Vivo X80 आणि X80 Pro 5G; किंमत मात्र कमी  

Next

Vivo X80 5G आणि X80 Pro 5G स्मार्टफोन अखेरीस भारतीय बाजारात लाँच झाले आहेत. ही कंपनीची फ्लॅगशिप सीरिज आहे जी शाओमी 12 प्रो, वनप्लस 10 प्रो, आयकू 9 प्रो, रियलमी जीटी 2 प्रो आणि आयफोन 13 स्मार्टफोन्सना टक्कर देईल. विवो एक्स80 आणि एक्स80 प्रो अंधारातील फोटोग्राफीसाठी V1+ कस्टम चिप देण्यात आली आहे. 

Vivo X80 आणि X80 Pro ची किंमत 

Vivo X80 स्मार्टफोनचा 8GB रॅम व 128GB मॉडेलची किंमत 54,999 रुपये आणि 12GB रॅम व 256GB मॉडेलची किंमत 59,999 रुपये आहे. X80 Pro चा 12GB रॅम व 256GB स्टोरेज मॉडेल 79,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या फोन्सची विक्री 25 मेपासून ई-कॉमर्स साईट Flipkart आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध होतील. 

Vivo X80 चे स्पेसिफिकेशन्स  

Vivo X80 मध्ये 6.78-इंचाचा फुलएचडी+ कर्व E5 AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट, 1000 निट्स पीक ब्राईटनेस आणि 100% DCI-P3 कलर गॅमुटला सपोर्ट करतो. हा डिवाइस MediaTek च्या फ्लॅगशिप Dimensity 9000 प्रोसेसरसह येतो.  

फोनमध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. तर मागे ट्रिपल कॅमेरा सेन्सर मिळतो. ज्यात सोनीचा नवीन 50MP IMX866 सेन्सर मुख्य कॅमेऱ्याची जबाबदारी पार पडतो. त्याचबरोबर 12MP ची अल्ट्रावाईड अँगल लेन्स आणि 12MP ची टेलीफोटो लेन्स आहे. फोनमध्ये 4,500mAh बॅटरी आहे, जी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. 

Vivo X80 Pro चे स्पेसिफिकेशन्स  

Vivo X80 Pro मध्ये देखील 6.78-इंचाचा डिस्प्ले 2K रिजोल्यूशनसह देण्यात आला आहे. तसेच हा HDR10+ ला आणि 1500 निट्स पीक ब्राईटनेसला सपोर्ट करते. या मॉडेलमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 1 चिपसेट मिळतो. यात 4700mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 80W फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.  

कॅमेरा सेगमेंट देखील खास आहे. यात Vivo V1+ ISP आहे आणि त्याचबरोबर मुख्य कॅमेऱ्यासाठी 50MP चा Samsung GNV सेन्सर मिळतो. मागे एक 48MP ची Sony IMX598 अल्ट्रावाईड अँगल लेन्स, 12MP Sony IMX663 टेलीफोटो लेन्स आणि 8MP पेरीस्कोप लेन्स मिळते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो.    

 

Web Title: Vivo X80 And Vivo X80 Pro Launched In India Price Specifications 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.