आरारारा खतरनाक! 5 कॅमेऱ्यांसह जबरदस्त Vivo X80 Pro करणार एंट्री; सॅमसंग-शाओमीच्या अडचणीत वाढ  

By सिद्धेश जाधव | Published: March 16, 2022 07:29 PM2022-03-16T19:29:53+5:302022-03-16T19:31:39+5:30

Vivo X80 सीरीजमध्ये X80, X80 Pro आणि X80 Pro Plus असे तीन मॉडेल सादर केले जाऊ शकतात.

Vivo X80 Pro May Launch With Dimensity 9000 Processor Details Leaked Head Of Launch  | आरारारा खतरनाक! 5 कॅमेऱ्यांसह जबरदस्त Vivo X80 Pro करणार एंट्री; सॅमसंग-शाओमीच्या अडचणीत वाढ  

(प्रतीकात्मक फोटो)

Next

Vivo आपल्या लोकप्रिय ‘एक्स’ सीरिजमध्ये फ्लॅगशिप स्मार्टफोन सादर करते. हे स्मार्टफोन्स वनप्लस, सॅमसंग, शाओमी आणि ओप्पोच्या हाय-एन्ड डिवाइसेजना टक्कर देतात. आता लवकरच कंपनी आपल्या Vivo X80 सीरीजचे स्मार्टफोन्स लाँच करणार आहे. या सीरीजमध्ये X80, X80 Pro आणि X80 Pro Plus असे तीन मॉडेल सादर केले जाऊ शकतात. यातील एका स्मार्टफोनची माहिती ऑनलाईन लीक झाली आहे.  

लिक्सनुसार, Vivo X80 Pro मॉडेल डायमेन्सिटी 9000 प्रोसेसरसह बाजारात येईल. जो मीडियाटेकचा फ्लॅगशिप प्रोसेसर आहे. तर सोबत 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात येईल. हा सोनीचा IMX8 किंवा IMX800 सेन्सर असू शकतो. फोनमध्ये कंपनीनं स्वतःहून डेव्हलप केलेला विवो V1 चिपसेट देखील देऊ शकते, अशी माहिती टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशननं दिली आहे.  

Vivo X80 Pro चे संभाव्य स्पेसिफिकेशन 

या फोनमध्ये 6.78 इंचाचा फुल एचडी+ E5 AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. फोनमध्ये 8 जीबी पर्यंत लेटेस्ट LPDDR5 रॅम आणि 256 जीबी पर्यंतची वेगवान UFS 3.1 स्टोरेज मिळू शकते. वर सांगितल्याप्रमाणे यात मीडियाटेकचा डिमेन्सिटी 9000 चिपसेट मिळेल. हा फोन अँड्रॉइड 12 ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल.  

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यात एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा मिळेल. तर अन्य तीन 12 मेगापिक्सलचे सेन्सर असतील. तर फ्रंटला 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळू शकतो. Vivo X80 Pro मधील 4700mAh ची बॅटरी 80 वॉट वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. तसेच 50 वॉट वायरलेस चार्जिंग सपोर्टही मिळेल.  

Web Title: Vivo X80 Pro May Launch With Dimensity 9000 Processor Details Leaked Head Of Launch 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.