दणकट फीचर्ससह Vivo X80 सीरीज करणार भारतात एंट्री; 12GB RAM सह मिळू शकतो वेगवान प्रोसेसर 

By सिद्धेश जाधव | Published: April 30, 2022 03:06 PM2022-04-30T15:06:16+5:302022-04-30T15:06:53+5:30

Vivo च्या भारतीय वेबसाईटवर Vivo X80 सीरीज लिस्ट करण्यात आली आहे, त्यामुळे देशात लवकरच या डिवाइसची एंट्री होणार हे निश्चित झालं आहे.  

Vivo X80 Series India Launch On May 18   | दणकट फीचर्ससह Vivo X80 सीरीज करणार भारतात एंट्री; 12GB RAM सह मिळू शकतो वेगवान प्रोसेसर 

दणकट फीचर्ससह Vivo X80 सीरीज करणार भारतात एंट्री; 12GB RAM सह मिळू शकतो वेगवान प्रोसेसर 

googlenewsNext

Vivo X80 सीरीजची वाट विवोचे चाहते अनेक दिवसांपासून बघत आहेत. भारतात सॅमसंग, वनप्लस, मोटोरोला, रियलमी आणि आता शाओमीने देखील आपले फ्लॅगशिप सादर केले आहेत. आता Vivo X80 आणि Vivo X80 Pro स्मार्टफोन्स लवकरच भारतात एंट्री घेऊ शकतात. कारण Vivo च्या अधिकृत वेबसाईटवर ही सिरीज दिसली आहे.  

भारतीय लाँच  

Vivo India वेबसाईटवर Vivo X80 सीरीज एका काउन्ट डाऊनसह लिस्ट करण्यात आली आहे. या लिस्टिंगमध्ये Coming Soon असं लिहिण्यात आलं आहे. काउन्ट डाउननुसार 18 दिवसांनी ही सिरीज लाँच केली जाईल. अर्थात येत्या 18 मे 2022 ला दुपारी 12 वाजता भारतात Vivo X80 आणि Vivo X80 Pro स्मार्टफोन्स लाँच केला जाऊ शकतात. वेबसाईटवर Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरचा उल्लेख देखील करण्यात आला आहे.  

Vivo X80 चे स्पेसिफिकेशन्स 

Vivo X80 फोन Android 12 आधारित OriginOS वर चालतो. यात 6.78 इंचाचा FHD+ 120Hz रिफ्रेश रेटसह डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन MediaTek Dimensity 9000 प्रोसेसरसह 12GB RAM आणि 512GB पर्यंतच्या स्टोरेजसह येईल. फोटोग्राफीसाठी 50MP चा मेन कॅमेरा, 12MP चा अल्ट्रा वाईड अँगल सेन्सर आणि 12MP च्या पोट्रेट लेन्ससह ट्रिपल रियर कॅमेरा मिळेल. सेल्फीसाठी फोन 32MP फ्रंट कॅमेरा असेल. यात 4500mAh ची बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंग मिळेल.  

Vivo X80 Pro चे स्पेसिफिकेशन्स  

Vivo X80 Pro फोन Snapdragon 8 Gen 1 चिपसेटसह येऊ शकतो. यात 6.78 इंचाचा E5 LTPO AMOLED डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह मिळेल. फोनमध्ये 12GB पर्यंत RAM आणि 512GB स्टोरेज असेल. ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप 50MP चा मेन कॅमेरा, 48MP चा अल्ट्रा वाईड अँगल सेन्सर आणि 8MP च्या पेरिस्कोप लेन्ससह देण्यात येईल. 32MP च्या फ्रंट कॅमेऱ्यासह यात 4700mAh ची बॅटरी 80W फास्ट चार्जिंगसह मिळेल.  

Web Title: Vivo X80 Series India Launch On May 18  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.