विवोची सर्वात शक्तिशाली सीरिज येत आहे ग्राहकांच्या भेटीला; Vivo X80 सीरीजमध्ये मिळणार भन्नाट फीचर्स 

By सिद्धेश जाधव | Published: November 17, 2021 11:51 AM2021-11-17T11:51:10+5:302021-11-17T11:51:45+5:30

Vivo X80 Series Launch Date: काही महिन्यांपूर्वी Vivo X70 सीरीज सादर करण्यात आली होती. आता कंपनी Vivo X80 सीरीजच्या तयारीला लागली आहे.  

Vivo x80 series may launch in india by february   | विवोची सर्वात शक्तिशाली सीरिज येत आहे ग्राहकांच्या भेटीला; Vivo X80 सीरीजमध्ये मिळणार भन्नाट फीचर्स 

विवोची सर्वात शक्तिशाली सीरिज येत आहे ग्राहकांच्या भेटीला; Vivo X80 सीरीजमध्ये मिळणार भन्नाट फीचर्स 

googlenewsNext

विवोने सप्टेंबरमध्ये आपली नवीन फ्लॅगशिप सीरिज Vivo X70 लाँच केली होती. परंतु लवकरच या सीरिजचे फोन्स आऊटडेटेड होणार आहेत. 91मोबाईल्सच्या रिपोर्टनुसार, Vivo X80 सीरीज लवकरच लाँच होणार आहे. ही सीरिज भारतात जानेवारीच्या शेवटी किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला लाँच केली जाऊ शकते. ज्यात Vivo X8 Pro आणि X80 Pro Plus हे दोन मॉडेल उपलब्ध होऊ शकतात.  

Vivo X80 सीरिज  

Vivo X80 सीरिज याआधी आलेल्या Vivo X70 सीरिजची जागा घेईल. नव्या फ्लॅगशिप सीरिजमध्ये कंपनीनं Vivo X80 Pro आणि X80 Pro Plus हे दोन फोन सादर करू शकते. या फोन्सची जास्त माहिती मिळाली नाही. पंरतु मीडिया रिपोर्टनुसार, बेस मॉडेलमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला FHD+ डिस्प्ले मिळेल. तसेच यात लेटेस्ट Mediatek Dimensity 2000 चिपसेट प्रोसेसिंगचे काम सांभाळेल. फोनमध्ये 50MP चा मुख्य सेन्सर मिळू शकतो. त्याचबरोबर 2x Zoom असलेली 12MP ची टेलीफोटो लेन्स दिली जाऊ शकते.  

सध्या उपलब्ध असलेल्या Vivo X70 Pro चे स्पेसिफिकेशन्स   

Vivo X70 Pro स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला 6.56-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आहे. या फोनमध्ये कंपनीने MediaTek Dimensity 1200 चिपसेटचा वापर केला आहे. या प्रोसेसरला 12GB पर्यंतच्या रॅम आणि 256GB स्टोरेजची जोड देण्यात आली आहे. हा फोन Android 11 आधारित FuntouchOS वर चालतो. अ‍ॅमोलेड डिस्प्ले असल्यामुळे या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो.      

Vivo X70 Pro स्मार्टफोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP चा मुख्य कॅमेरा आहे जो OIS, गिंबल स्टेबलाइजेशन 3.0 टेक्नॉलॉजी, Zeiss ऑप्टिक्स आणि Zeiss T* कोटिंगसह सादर करण्यात आला आहे. त्याचबरोबर 12MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स, 12 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 5X झूम देणारी 8 मेगापिक्सलचा पेरिस्कोप कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. हा फोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये 5G, 4G LTE, ड्युअल-बँड Wi-Fi, Bluetooth 5.1, GPS, आणि USB Type-C पोर्ट असे ऑप्शन्स मिळतात. या विवो फोनमधील 4,450mAh ची बॅटरी 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. 

Web Title: Vivo x80 series may launch in india by february  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.