विवो वाय 53 झाला स्वस्त, किंमतीत एक हजार रूपयांनी कपात
By शेखर पाटील | Published: December 8, 2017 01:20 PM2017-12-08T13:20:58+5:302017-12-08T13:23:17+5:30
विवो कंपनीने आपल्या वाय 53 या स्मार्टफोनच्या मूल्यात एक हजार रूपयांनी कपात केली आहे. यामुळे आता हे मॉडेल 8 हजार 990 रूपयात ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहे.
विवो कंपनीने आपल्या वाय 53 या स्मार्टफोनच्या मूल्यात एक हजार रूपयांनी कपात केली आहे. यामुळे आता हे मॉडेल 8 हजार 990 रूपयात ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहे.
या वर्षीच्या मार्च महिन्यात विवो कंपनीने विवो वाय 53 हे मॉडेल भारतीय बाजारपेठेत 9 हजार 990 रूपये मूल्यात लाँच केले होते. यात आता हजार रूपयांची कपात करण्यात आली आहे. भारतीय ग्राहकांना एंट्री लेव्हल आणि मध्यम किंमतपट्टयातील स्मार्टफोन आवडत असल्याचे आधीच अधोरेखित झाले आहेत. यातच अनेक कंपन्यांनी पाच ते सात हजार रूपयांमध्ये अनेक उत्तमोत्तम पर्याय सादर केल्यामुळे विवो वाय 53च्या मूल्यात कपात करण्यात आल्याचे मानले जात आहे.
विवो वाय 53 या मॉडेलमध्ये पाच इंच आकारमानाचा आणि 960 बाय 540 पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. याची रॅम दोन जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज 16 जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने 256 जीबी इतकी वाढविण्याची सुविधा असेल. यातील कॅमेरे 8 व 5 मेगापिक्सल्सचे तर बॅटरी 2500 मिलीअँपिअर क्षमतेची असेल. हे मॉडेल अँड्रॉइडच्या मार्शमॅलो या आवृत्तीवर चालणारे असून यावर कंपनीचा फनटच 3.0 हा युजर इंटरफेस असेल. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तसेच यात अॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत.