विवो वाय ७१ बाजारपेठेत दाखल

By शेखर पाटील | Published: April 17, 2018 01:46 PM2018-04-17T13:46:23+5:302018-04-17T13:46:23+5:30

विवो कंपनीने आपला वाय ७१ हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

Vivo Y filed in market 71 | विवो वाय ७१ बाजारपेठेत दाखल

विवो वाय ७१ बाजारपेठेत दाखल

Next

विवो कंपनीने आपला वाय ७१ हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. विवो वाय ७१ हे मॉडेल ग्राहकांना देशभरातील शॉपीजमधून ऑफलाईन पद्धतीनं १०,९९० रूपये मूल्यात खरेदी करता येणार आहे. तर फ्लिपकार्ट, अमेझॉन, पेटीएम आदींसह विवो-ईस्टोअरच्या संकेतस्थळावरूनही हा स्मार्टफोन उपलब्ध करण्यात आला आहे. गेल्या महिन्यातच विवो कंपनीने व्ही ९ हा फ्लॅगशीप श्रेणीतील स्मार्टफोन लाँच केला होता. यानंतर या कंपनीने पुन्हा एकदा भारतात लोकप्रिय असणार्‍या मिड-रेंजवर लक्ष केंद्रीत करत विवो वाय ७१ हे मॉडेल लाँच केले आहे. विवोने आधीदेखील वाय या मालिकेत विविध मॉडेल्स सादर केले असले तरी वाय ७१ हा स्मार्टफोन १८:९ गुणोत्तरयुक्त फुल व्ह्यू या प्रकारातील डिस्प्लेने सज्ज असणारा पहिला स्मार्टफोन ठरला आहे.

हा डिस्प्ले ६ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस अर्थात १३६६ बाय ७६८ पिक्सल्स क्षमतेचा असेल. याची बांधणी हाय पॉलिमर नॅनो-ब्लास्टींगच्या माध्यमातून करण्यात आली आहे. यामध्ये फेस अ‍ॅक्सेस हे फिचर देण्यात आले आहे. याच्या माध्यमातून युजर आपल्या चेहर्‍याने स्मार्टफोन अनलॉक करू शकतो. विशेष बाब म्हणजे अन्य कोणतेही काम करत असतांना युजरने स्मार्टफोनच्या स्क्रीनकडे पाहिल्यास व्हॉल्यूम कमी करण्याची सुविधादेखील या फिचरमध्ये देण्यात आली आहे.

 

विवो वाय ७१ या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन ४२५ प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम ३ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डने वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे.  याच्या दोन्ही कॅमेर्‍यांमध्ये कृत्रीम बुध्दीमत्ता अर्थात एआय तंत्रज्ञान प्रदान करण्यात आले आहे. यातील मुख्य कॅमेरा हा एलईडी फ्लॅश आणि पीडीएएफ या तंत्रज्ञानाने युक्त आहे. तर याच एआयच्या मदतीने फोटोतील चेहर्‍याशी सुसंगत असा प्रकाश आपोआप अ‍ॅडजस्ट केला जातो. तर फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सल्सचा असून यात एआययुक्त ब्युटी फेस हे फिचर दिलेले आहे. याच्या मदतीने सेल्फी काढणार्‍याचे लिंग, वय, वर्ण आदींना लक्षात घेत विविध ब्युटी इफेक्ट देता येतात. यामध्ये ३३६० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून यात विवो सर्च इंजिन देण्यात आले आहे. याचा उपयोग करून बॅटरीची स्थिती जाणून घेता येते. तर हा स्माटर्र्फोन अँड्रॉइडच्या ८.१ ओरिओ या आवृत्तीपासून विकसित केलेल्या फनटच या ऑपरेटींग सिस्टीमवर चालणारा आहे. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तसेच यात फिंगरप्रिंट स्कॅनरसह अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत.  

Web Title: Vivo Y filed in market 71

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.