5000mAh च्या दमदार बॅटरीसह आला Vivo Y01; दमदार प्रोसेसरसह स्वस्त स्मार्टफोन लाँच
By सिद्धेश जाधव | Published: May 17, 2022 09:14 AM2022-05-17T09:14:37+5:302022-05-17T09:16:29+5:30
Vivo Y01 स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी, 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि MediaTek Helio P35 चिपसेट देण्यात आला आहे.
Vivo लवकरच भारतात आपली फ्लॅगशिप Vivo X80 सीरिज सादर करणार आहे. तत्पूर्वी कंपनीनं आपल्या बजेट स्मार्टफोन पोर्टफोलियोचा देखील विस्तार केला आहे. Vivo Y01 स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. या फोनमध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे, जी रिवर्स चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच MediaTek Helio P35 प्रोसेसरची ताकद देखील मिळते.
Vivo Y01 ची किंमत
Vivo चा हा स्मार्टफोन भारतात फक्त 8,999 रुपयांच्या किंमतीत सादर करण्यात आला आहे. हा फोन ब्लॅक आणि ब्लू या दोन कलर्समध्ये विकत घेता येईल. हा डिवाइस कंपनीच्या अधिकृत वेबसाईटसह ऑफलाईन स्टोर्सवरून विकत घेता येईल.
Vivo Y01 चे स्पेसिफिकेशन्स
Vivo Y01 स्मार्टफोनमध्ये 6.51 इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. जो आय प्रोटेक्शन मोडसह येईल. प्रोसेसिंगसाठी कंपनीनं MediaTek Helio P35 प्रोसेसर दिला आहे. दमदार परफॉर्मन्ससाठी Multi-Turbo 3.0 ला सपोर्ट देण्यात आला आहे. फोनमध्ये 2GB RAM आणि 32 GB स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. जी मायक्रोएसडी कार्डच्या मदतीनं 1TB पर्यंत वाढवता येते.
हा फोन Funtouch OS 11.1. वर चालतो. हा स्मार्टफोन 5000mAh च्या बॅटरीसह सादर करण्यात आला आहे. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह यात फेस वेक फिचर देण्यात आलं आहे. Vivo Y01 स्मार्टफोनच्या रियर पॅनलवर LED फ्लॅशसह 8MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच फ्रंटला 5 MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो.