खिशाला परवडणाऱ्या किंमतीती Vivo चे दोन ढासू स्मार्टफोन लाँच; 5000mAh ची बॅटरी चालेल दिवसभर 

By सिद्धेश जाधव | Published: January 15, 2022 12:11 PM2022-01-15T12:11:05+5:302022-01-15T12:11:13+5:30

Vivo Y10 And Vivo Y1 T1: Vivo Y10 आणि Vivo Y1 T1 च्या स्पेसिफिकेशन्समध्ये फक्त प्रोसेसरचा फरक आहे. हे फोन्स 5000mAh बॅटरी, 13MP कॅमेरा आणि 4GB RAM सह बाजारात आले आहेत.

Vivo y10 and vivo y1 t1 smartphone launched  | खिशाला परवडणाऱ्या किंमतीती Vivo चे दोन ढासू स्मार्टफोन लाँच; 5000mAh ची बॅटरी चालेल दिवसभर 

खिशाला परवडणाऱ्या किंमतीती Vivo चे दोन ढासू स्मार्टफोन लाँच; 5000mAh ची बॅटरी चालेल दिवसभर 

Next

Vivo सध्या एका मागून एक स्मार्टफोन सादर करत आहे. कंपनीनं कालच भारतात Vivo Y21e स्मार्टफोन बजेट सेगमेंटमध्ये सादर केला आहे. तर तिकडे चीनमध्ये कंपनीनं Vivo Y10 आणि Vivo Y10 T1 हे फोन्स सादर केले आहेत. दोन्ही स्मार्टफोनच्या किंमतीत आणि स्पेसिफिकेशनमध्ये इतका फरक नाही. डिजाईनही एकसारखी देण्यात आली आहे.  

Vivo Y10 आणि Vivo Y1 T1 चे स्पेसिफिकेशन्स 

बाकी स्पेक्स जरी एक सारखे असले तरी या फोन्सच्या प्रोसेसरमध्ये फरक आहे. Vivo Y10 स्मार्टफोन MediaTek Helio P35 SoC वर चालतो आणि यात eMMC 5.1 स्टोरेज मिळते. तर Vivo Y1 T1 व्हर्जन Helio P70 चिपसेट व UFS 2.1 स्टोरेजसह बाजारात आला आहे. दोन्ही विवो फोन्स Android 11 आधारित OriginOS वर चालतात. 

Vivo Y10 आणि Vivo Y1 T1 या स्मार्टफोनमध्ये 6.51-इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. दोन्ही स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 13MP प्रायमरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. यात 8MP चा सेन्सर सेल्फी कॅमेऱ्याचे काम करतो. दोन्ही फोन्स बेसिक कनेक्टिव्हिटीसह साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करतात. पॉवर बॅकअपसाठी या विवो स्मार्टफोन्समध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी नॉर्मल युजवर दिवसभर चालू शकते.  

Vivo Y10 आणि Vivo Y1 T1 ची किंमत 

Vivo Y10 आणि Vivo Y1 T1 दोन्ही स्मार्टफोनमध्ये 4GB RAM आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. हे फोन्स मुनलाईट नाईट व ग्लेशियर ब्लू रंगात विकत घेता येतील. कंपनीनं यांची किंमत 1,099 युआन ठेवली आहे. ही किंमत सुमारे 12,800 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. हे फोन्स भारतीयांच्या भेटीला कधी येतील हे मात्र अजून समजलं नाही. 

हे देखील वाचा:

13 हजारांच्या आत आला Vivo चा धमाकेदार स्मार्टफोन; डिजाईन पाहून Realme-Xiaomi युजर्स देखील करतील स्विच

नेटवर्क नसल्याची 'पोस्ट' करण्यापेक्षा अशी करा कॉल ड्रॉपची तक्रार; कंपनीला होऊ शकतो लाखोंचा दंड

Web Title: Vivo y10 and vivo y1 t1 smartphone launched 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.