विवोने स्वस्तात लाँच केला अजून एक दमदार स्मार्टफोन; जाणून घ्या Vivo Y12A ची किंमत
By सिद्धेश जाधव | Published: June 21, 2021 11:37 AM2021-06-21T11:37:26+5:302021-06-21T12:38:34+5:30
Vivo Y12A launch: विवोने Y सीरीजमध्ये Vivo Y12A हा पाचवा स्वस्त स्मार्टफोन लाँच केला आहे.
चिनी कंपनी विवोने Y सीरीजमध्ये अजून एक स्वस्त स्मार्टफोन लाँच केला आहे. विवोने सिंगापूर आणि थायलंडमध्ये Vivo Y12A हा स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स मोठ्या प्रमाणावर वियतनाममध्ये लाँच करण्यात आलेल्या Vivo Y12s 2021 सारखे आहेत. त्यामुळे हा फोन रिब्रँड व्हर्जन वाटत आहे. (Vivo launched Vivo Y12A in Singapore and Thailand)
Vivo Y12A चे स्पेसिफिकेशन्स
Vivo Y12A मध्ये 6.51 इंचाची IPS LCD स्क्रीन देण्यात आली आहे. हा फोन वाटरड्रॉप नॉच डिस्प्लेसह येतो. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन HD+ (720 x 1600 पिक्सल) आणि अस्पेक्ट रेश्यो 20:9 आहे. या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमधील 13 मेगापिक्सलच्या मुख्य कॅमेऱ्याला 2 मेगापिक्सलच्या सेकंडरी कॅमेऱ्याची जोड देण्यात आली आहे. विवोच्या या स्मार्टफोनमध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
विवोच्या या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 439 चिपसेट, 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज देण्यात आली आहे. हि स्टोरेज microSD कार्डच्या माध्यमातून वाढवता येते. Vivo Y12A मध्ये कंपनीने 5,000mAh ची बॅटरी आणि 10W फास्ट चार्जिंग मिळतो. हा फोन 5W रिवर्स चार्जिंगला देखील सपोर्ट करतो, म्हणजे तुम्ही या फोनचा वापर करून दुसरा फोन चार्ज करू शकता. सिक्योरिटीसाठी या फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे.
Vivo Y12A ची किंमत
Vivo Y12A थायलंडमध्ये 4,499 Baht (अंदाजे 10,600 रुपये) मध्ये लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन ब्लू आणि ग्रीन अश्या दोन रंगात सादर करण्यात आला आहे.