विवोचा लो बजेट स्मार्टफोन Vivo Y12G भारतात लाँच; जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स
By सिद्धेश जाधव | Published: August 5, 2021 01:02 PM2021-08-05T13:02:03+5:302021-08-05T13:09:18+5:30
Vivo Y12G India launch: Vivo Y12G चा एकच व्हेरिएंटमध्ये भारतात लाँच झाला आहे. हा फोन फॅंटम ब्लॅक आणि ग्लेशियर ब्लू रंगात विवो इंडियाच्या वेबसाइटवर खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे.
Vivo ने आपल्या Y-सीरीजमध्ये नवीन स्मार्टफोन जोडला आहे. कंपनीने भारतात नवीन फोन विवो Y12G लाँच केला आहे. हा स्मार्टफोन गेल्यावर्षी जूनमध्ये लाँच झालेल्या Vivo Y12 स्मार्टफोनचा अपग्रेड व्हर्जन आहे. या फोनचा एकच व्हेरिएंट भारतात लाँच केला आहे. चला जाणून घेऊया या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत
Vivo Y12G ची किंमत
Vivo Y12G चा एकच व्हेरिएंटमध्ये भारतात लाँच झाला आहे. या 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 10,999 रुपये आहे. हा फोन फॅंटम ब्लॅक आणि ग्लेशियर ब्लू रंगात विवो इंडियाच्या वेबसाइटवर खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे.
Vivo Y12G चे स्पेसिफिकेशन्स
Vivo Y12G मध्ये 6.51-इंचाचा एचडी+ आयपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 720×1,600 पिक्सल रिजोल्यूशन आणि 20:9 अस्पेक्ट रेशियोला सपोर्ट करतो. प्रोसेसिंगसाठी कंपनीने या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 439 SoC दिली आहे. त्याचबरोबर 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज मिळते. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डने वाढवता येते.
फोटोग्राफीसाठी Vivo Y12s मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला हे. यात 13-मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर आणि 2-मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर मिळतो. हा फोन 8-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी या ड्युअल सिम फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. Vivo Y12G स्मार्टफोन अँड्रॉइड 10 आधारित फनटच ओएस 11 वर चालतो. पावर बॅकअपसाठी या विवो फोनमध्ये 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे.