Vivo करणार लो बजेटमध्ये शक्तिप्रदर्शन; स्वस्त Vivo Y15s स्मार्टफोन देऊ शकतो शाओमी-रियलमीला टक्कर
By सिद्धेश जाधव | Published: August 26, 2021 07:29 PM2021-08-26T19:29:14+5:302021-08-26T19:29:55+5:30
Vivo Y15s Specifications: समोर आलेले स्पेक्स पाहता विवो वाय15एस लो बजेट सेगमेंटमध्ये सादर केला जाऊ शकतो. ज्याची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते.
यावर्षीच्या सुरुवातीला शांत असलेली स्मार्टफोन निर्माता कंपनी Vivo सध्या जास्त सक्रिय झाल्याचे दिसते. नुकतेच कंपनीने भारतात Vivo Y21 आणि Vivo Y33s नावाचे दोन स्मार्टफोन्स सादर केले होते. तसेच कंपनी Vivo Y21s स्मार्टफोन देखील काम करत असल्याची बातमी आली आहे. दुसरीकडे फ्लॅगशिप X70 सीरिज देखील अधूनमधून बातम्यांमध्ये येत असते. परंतु आज कंपनीच्या अजून एका लो बजेट फोन स्मार्टफोनची बातमी आली आहे, जो Vivo Y15s नावाने लाँच केला जाईल.
Vivo Y15s ची माहिती टेक वेबसाईट नॅशविलेच्या माध्यमातून समोर आली आहे. या वेबसाइटने चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर एक नवीन विवो फोन बघितला आहे. हा फोन 26 ऑगस्ट रोजी बेंचमार्किंग साईटवर लिस्ट करण्यात आला आहे, ज्याचा मॉडेल नंबर Vivo V2120 आहे. हा फोन विवो वाय15एस नावाने बाजारात दाखल होईल, अशी चर्चा आहे.
Vivo Y15s चे स्पेसिफिकेशन्स
विवो वाय15एस स्मार्टफोन बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर MT6765V/CB मदरबोर्डसह दिसला आहे. हे MediaTek Helio G35 चिपसेटचे कोडनेम आहे. या प्रोसेसरसह येणारा पहिला विवो फोन असेल. तसेच या फोनमध्ये 2.30गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला आक्टाकोर प्रोसेसर देखील देण्यात येईल. या फोनमध्ये 2GB रॅम दिला जाऊ शकतो. यापेक्षा जास्त रॅम असलेला व्हेरिएंट बाजारात येण्याची शक्यता देखील आहे. अँड्रॉइड 11 ओएस सह येणाऱ्या या फोनला सिंगल-कोर मध्ये 150 आणि मल्टी-कोर मध्ये 549 बेंचमार्किंग स्कोर मिळाला आहे. समोर आलेले स्पेक्स पाहता विवो वाय15एस लो बजेट सेगमेंटमध्ये सादर केला जाऊ शकतो. ज्याची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते.