मूळ किंमतीपेक्षा स्वस्त झाले Vivo चे दोन फोन; कायमस्वरूपी कपात, 1 हजाराचा कॅशबॅक देखील मिळणार

By सिद्धेश जाधव | Published: May 3, 2022 05:17 PM2022-05-03T17:17:05+5:302022-05-03T17:17:10+5:30

Vivo नं आपल्या दोन स्मार्टफोन्सच्या किंमतीत कपात केली आहे. कायमस्वरूपी Vivo Y21 आणि Y21e ची किंमत कमी करण्यात आली आहे.  

Vivo Y21 And Y21e Gets A Huge Price Cut And Cashback Offer   | मूळ किंमतीपेक्षा स्वस्त झाले Vivo चे दोन फोन; कायमस्वरूपी कपात, 1 हजाराचा कॅशबॅक देखील मिळणार

मूळ किंमतीपेक्षा स्वस्त झाले Vivo चे दोन फोन; कायमस्वरूपी कपात, 1 हजाराचा कॅशबॅक देखील मिळणार

googlenewsNext

विवोनं आपल्या वाय सीरीजच्या Vivo Y21 आणि Vivo Y21e या दोन स्मार्टफोन्सची किंमत कमी केली आहे. त्यामुळे तुम्ही जर बजेट स्मार्टफोन शोधत असाल तर हे फोन्स आता आणखी स्वस्त झाले आहेत. रिटेलर महेश टेलिकॉमनं दिलेल्या माहितीनुसार कंपनीनं दोन्ही हँडसेटच्या किंमतीत 500 रुपयांची कायमस्वरूपी कपात केली आहे.  

नवीन किंमत  

प्राईस कटनंतर 13,490 रुपयांच्या Vivo Y21 स्मार्टफोन आता 13,490 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. तर Vivo Y21e आता 12,490 रुपयांमध्ये विकत घेता येईल, जो आधी 12,990 रुपयांमध्ये मिळत होते. हे दोन्ही स्मार्टफोन नवीन किंमतीत फ्लिपकार्टवर उपलब्ध झाले आहेत. तसेच One Card च्या युजर्सना या स्मार्टफोन्सच्या खरेदीवर 10 मेपर्यंत 1 हजार रुपयांचा कॅशबॅक देखील देण्यात येईल.  

Vivo Y21 चे स्पेसिफिकेशन्स  

Vivo Y21 मध्ये कंपनीने 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले दिला आहे. हा एक वॉटरड्रॉप नॉच असलेला एलसीडी पॅनल आहे. जो 20:9 अस्पेक्ट रेशियो आणि 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशनआला सपोर्ट करतो. या विवो फोनमध्ये मीडियाटेकचा हीलियो पी35 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 वर आधारित फनटच ओएस 11.1 वर चालतो. हा फोन 4GB रॅम + 1GB एक्सटेंडेड रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.  

Vivo Y21 च्या बॅक पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप मिळतो. या सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर देण्यात आला आहे. त्याचबरोबर कंपनीने 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर दिला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या विवो फोनमध्ये 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा मिळतो. साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर असलेला हा फोन 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. 

Vivo Y21e चे स्पेसिफिकेशन्स  

विवो वाय21ई स्मार्टफोनमध्ये 1600 × 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.51 इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एक वॉटरड्रॉप नॉच डिजाईन असलेला एलसीडी पॅनल आहे. हा फोन अँड्रॉइड 11 ओएसवर बेस्ड फनटच ओएस 12 वर चालतो. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट देण्यात आला आहे. सोबत 3 जीबी रॅम आणि 512 एमबी एक्सटेंडेड रॅम मिळतो. या विवो फोनमध्ये 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.  

या विवो फोनच्या मागे ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर आहे. हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह Vivo Y21e मध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. पॉवर बॅकअपसाठी यात 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. हा विवो फोन Midnight Blue आणि Diamond Glow कलरमध्ये विकत घेता येईल. 

Web Title: Vivo Y21 And Y21e Gets A Huge Price Cut And Cashback Offer  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.