Vivo Smartphone: दिलखेचक लुकसह आला Vivo Y21A; 14 हजारांच्या आत 5GB RAM आणि 5,000mAh Battery
By सिद्धेश जाधव | Published: January 25, 2022 11:47 AM2022-01-25T11:47:46+5:302022-01-25T11:48:06+5:30
Vivo Smartphone Vivo Y21A: Vivo इंडियानं काही दिवसांपूर्वी 5GB RAM, 5000mAh बॅटरी आणि 13MP रियर कॅमेरा असलेला स्मार्टफोन वेबसाईटवर लिस्ट केला होता. आता या स्मार्टफोनची किंमत समोर आली आहे.
VIVO नं भारतातील ‘वाय सीरीज’ विस्तार सुरूच ठेवला आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीच्या वेबसाईटवर दिसलेल्या Vivo Y21A ची किंमत आता समोर आली आहे. हा फोन आकर्षक डिजाईन आणि लूकसह सादर करण्यात आहे. याची किंमतीही 14 हजारांच्या आत ठेवण्यात आली आहे. चला जाणून घेऊया Vivo Y21A ची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स.
Vivo Y21A ची किंमत
विवो वाय21ए स्मार्टफोनची किंमत 13,990 रुपये ठेवण्यात आली आहे. ही फोनच्या एकमेव व्हेरिएंटची किंमत आहे, ज्यात 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज मिळते. हा फोन आजपासून ऑनलाईन आणि ऑफलाईन प्लॅटफॉर्म्सवरून विकत घेता येईल. या नवीन विवो मोबाईलचे Midnight Blue आणि Diamond Glow असे दोन कलर व्हेरिएंट सादर करण्यात आले आहेत.
Vivo Y21A चे स्पेसिफिकेशन्स
विवो वाय21ए मध्ये 6.51 इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 11 वर लाँच झाला आहे आणि फनटच ओएस 11.1 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी यात आक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो पी22 चिपसेट देण्यात आला आहे. सोबत 4 जीबी रॅम मिळतो जो एक्सटेंडेड रॅम 2.0 टेक्नॉलॉजीनं 1जीबी पर्यंत वाढवता येतो. म्हणजे एकूण 5 जीबी रॅम आहे. हा फोन 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी मायक्रोएसडी कार्डनं 1टीबी पर्यंत वाढवता येते.
हा एक ड्युअल सिम फोन आहे ज्यात बेसिक कनेक्टिव्हिटी फिचरसह साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. फोटोग्राफीसाठी या नवीन विवो फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये एलईडी फ्लॅश लाईटसह 13 मेगापिक्सलचा प्रायमरी एआय सेन्सर आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. डिवाइसमध्ये 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा मिळतो. पॉवर बॅकअपसाठी विवो वाय21ए मध्ये 5,000एमएएच बॅटरी 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे.
हे देखील वाचा:
- Vivo 5G Smartphone: Vivo बदलणार गियर! स्वस्त 5G Phone सेगमेंटमध्ये राडा करण्यासाठी येतोय नवीन स्मार्टफोन
- मुलांना शाळेत पाठवायचं नाही? हा 5,499 रुपयांचा स्मार्टफोन करेल ऑनलाईन क्लासेसमध्ये मदत, सेलनंतर वाढू शकते किंमत