13 हजारांच्या आत आला Vivo चा धमाकेदार स्मार्टफोन; डिजाईन पाहून Realme-Xiaomi युजर्स देखील करतील स्विच
By सिद्धेश जाधव | Published: January 14, 2022 07:16 PM2022-01-14T19:16:03+5:302022-01-14T19:16:14+5:30
Vivo Y21e Price In India: Vivo Y21e स्मार्टफोन भारतात 5000mAh बॅटरी, 3GB RAM आणि 64GB स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे.
Vivo Y21e Price In India: VIVO आपल्या वाय सीरिजचा विस्तार सुरूच ठेवला आहे. Vivo Y21T आणि Vivo Y33T हे दोन स्मार्टफोन यावर्षी देशात सादर केल्यानंतर आता नवीन Vivo Y21e देखील भारतात आला आहे. कंपनीनं या बजेट सेगमेंटमधील स्मार्टफोनची घोषणा केली आहे. 5000mAh बॅटरी, 3GB RAM आणि 64GB स्टोरेज असलेला विवो वाय21ई स्मार्टफोन 12,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
Vivo Y21e चे स्पेसिफिकेशन्स
विवो वाय21ई स्मार्टफोनमध्ये 1600 × 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.51 इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एक वॉटरड्रॉप नॉच डिजाईन असलेला एलसीडी पॅनल आहे. हा फोन अँड्रॉइड 11 ओएसवर बेस्ड फनटच ओएस 12 वर चालतो. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट देण्यात आला आहे. सोबत 3 जीबी रॅम आणि 512 एमबी एक्सटेंडेड रॅम मिळतो. या विवो फोनमध्ये 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.
या विवो फोनच्या मागे ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर आहे. हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह Vivo Y21e मध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. पॉवर बॅकअपसाठी यात 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. हा विवो फोन Midnight Blue आणि Diamond Glow कलरमध्ये विकत घेता येईल.
हे देखील वाचा:
12GB रॅम आणि 50MP कॅमेऱ्यासह OnePlus 9RT 5G लाँच; सर्वच स्पेक्स एक नंबर
हे काम करा म्हणजे IRCTC वरून मिळेल कन्फर्म Tatkal Ticket