Vivo करणार कमाल! मनाला मोहवणाऱ्या डिजाईनसह Vivo Y21e करणार एंट्री; डिजाइन-स्पेसिफिकेशन्स लीक
By सिद्धेश जाधव | Published: January 14, 2022 04:56 PM2022-01-14T16:56:11+5:302022-01-14T16:56:34+5:30
Vivo Y21e Smartphone Launch: Vivo Y21e स्मार्टफोनची डिजाईन आणि स्पेसिफिकेशन्स लाँच पूर्वीच लीक झाले आहेत. लिक्सवरून हा एक बजेट स्मार्टफोन असेल, असं दिसतंय.
Vivo आपल्या आकर्षक डिजाईन असलेल्या स्मार्टफोन्ससाठी ओळखली जाते. कंपनी सुंदर रंगांचा वापर करत असते. अलीकडेच विवोनं भारतात रंग बदलणारे दोन स्मार्टफोन V सीरिजमध्ये सादर केले होते. आता कंपनी Y सीरिजमध्ये Vivo Y21e स्मार्टफोनच्या तयारीला लागली आहे. या फोनची अधिकृत माहिती मिळाली नाही, परंतु 91mobiles नं रिपोर्टमधून Vivo Y21e च्या डिजाइन आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती शेयर केली आहे.
Vivo Y21e
रिपोर्टनुसार, Vivo Y21e स्मार्टफोन वॉटरड्रॉप नॉच असलेल्या डिस्प्लेसह बाजारात येईल. हा 6.51 इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले असेल. या फोनमध्ये उजवीकडे वॉल्यूम, पॉवर बटन आणि साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळेल.
फोनच्या मागे आयताकृती कॅमेरा सेट दिसत आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह दोन कॅमेरा सेन्सर मिळतील. फोनमध्ये 13MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 2MP चा सेकंडरी कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो. सेल्फीसाठी फोनमध्ये 8MP चा सेन्सर मिळेल.
विवोचा हा फोन Android 12 आधारित Funtouch OS 12 वर चालेल. या फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट दिला जाईल. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 680 SoC दिला जाऊ शकतो. फोनच्या तळाला टाईप सी पोर्ट, ऑडिओ जॅक, स्पीकर ग्रील आणि माईक मिळेल. हा फोन व्हाइट आणि ब्लू कलर व्हेरिएंटसह बाजारात येईल.
हे देखील वाचा:
हे काम करा म्हणजे IRCTC वरून मिळेल कन्फर्म Tatkal Ticket
7700mAh च्या राक्षसी बॅटरीसह Motorola नं लाँच केला टॅबलेट; जाणून घ्या Moto Tab G70 ची किंमत