विवोचा अजून एक बजेट स्मार्टफोन लाँचच्या मार्गावर; दमदार बॅटरीसह Vivo Y21s वेबसाइटवर लिस्ट 

By सिद्धेश जाधव | Published: August 25, 2021 01:08 PM2021-08-25T13:08:15+5:302021-08-25T14:29:01+5:30

Vivo Y21s FCC Listing: वाय सीरिजमधील Vivo Y21s हा फोन आता Federal Communications Commission (FCC) या सर्टिफिकेशन साईटवर दिसला आहे.

Vivo y21s bags fcc certification launch soon  | विवोचा अजून एक बजेट स्मार्टफोन लाँचच्या मार्गावर; दमदार बॅटरीसह Vivo Y21s वेबसाइटवर लिस्ट 

हा प्रतीकात्मक फोटो Vivo Y21 चा आहे.

googlenewsNext

अलीकडेच Vivo ने भारतीय बाजारात Vivo Y33s आणि Vivo Y21 असे दोन स्मार्टफोन सादर केले आहेत. आता यातील Vivo Y21 स्मार्टफोनच्या नव्या व्हर्जनच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. हा नवीन स्मार्टफोन वाय-सीरीजमध्ये Vivo Y21s नावाने सादर केला जाऊ शकतो. वाय सीरिजमधील हा फोन आता Federal Communications Commission (FCC) या सर्टिफिकेशन साईटवर दिसला आहे. या लिस्टिंगमुळे लवकरच हा फोन बाजारात दाखल होऊ शकतो, अशी चर्चा आहे.  

Vivo Y21s ची लिस्टिंग  

FCC लिस्टिंग वरून Vivo Y21s स्मार्टफोनच्या काही स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. हा फोन एफसीसीवर V2110 मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे. याच मॉडेल नंबरसह हा फोन ग्लोबल सर्टिफिकेशन फोरम (GCF) वर देखील लिस्ट करण्यात आला होता. तिथून या स्मार्टफोनच्या Vivo Y21s नावाची माहिती मिळाली होती, हा फोन गिकबेंचवर देखील दिसला होता.  

लिस्टिंगनुसार हा स्मार्टफोन 6.51-इंचाचा टियर ड्रॉप नॉच डिस्प्लेसह सादर केला जाऊ शकतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये Helio G80 चिपसेट देण्यात येईल. तसेच हा फोन 4GB रॅम आणि Android 11 ओएसवर चालेल. कनेक्टिव्हिटीसाठी या स्मार्टफोनमध्ये ड्युअल-बॅंड वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस/ग्लोनास/बीडीएस/गॅलीलियो, USB-C पोर्ट आणि 3.5mm ऑडियो जॅक असे ऑप्शन देण्यात येतील.  

या फोनचा आकार 164.26 x 76.08 x 8 मिमी आहे आणि याचे वजन 180 ग्राम आहे. तसेच हा फोन ‘BK-C2’ मॉडेल नंबर असलेल्या चार्जिंग केबल आणि ‘XE610’ मॉडेल ईयरफोनला सपोर्ट करेल. लिस्टिंगनुसार या फोनमध्ये 4,910mAh (5,000mAh ) ची बॅटरी देण्यात येईल. Vivo Y21s स्मार्टफोनच्या FCC सर्टिफिकेशनवरून या फोनचा लाँच नजीक आल्याचे समजते.  

Web Title: Vivo y21s bags fcc certification launch soon 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.