3 जानेवारीला भारतात येतोय Vivo चा ढासू स्मार्टफोन; 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी, लूकसह स्पेक्सही आकर्षक 

By सिद्धेश जाधव | Published: December 29, 2021 03:11 PM2021-12-29T15:11:10+5:302021-12-29T15:11:44+5:30

Vivo Y21T India Launch: Vivo Y21T स्मार्टफोन भारतात 3 जानेवारीला लाँच केला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन 18W फास्ट चार्जिंग, 128GB स्टोरेज आणि 5000mAh बॅटरीसह सादर केला जाऊ शकतो.

Vivo y21t india launch timeline and specifications revealed   | 3 जानेवारीला भारतात येतोय Vivo चा ढासू स्मार्टफोन; 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी, लूकसह स्पेक्सही आकर्षक 

3 जानेवारीला भारतात येतोय Vivo चा ढासू स्मार्टफोन; 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी, लूकसह स्पेक्सही आकर्षक 

Next

Vivo लवकरच आपल्या Y सीरीज अंतर्गत नवीन स्मार्टफोन भारतात सादर करणार आहे. हा फोन Vivo Y21T नावानं देशात येणार असल्याची माहिती 91mobiles नं दिली आहे. इतकेच नव्हे तर रिपोर्टनुसार हा फोन पुढील आठवड्यात ग्राहकांच्या भेटीला येईल. स्पेसिफिकेशन्सवरून हा फोन मिड-रेंजमध्ये सादर केला जाईल, हे स्पष्ट झाले आहे.

Vivo Y21T स्मार्टफोन भारतात 3 जानेवारीला लाँच केला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन 18W फास्ट चार्जिंग, 128GB स्टोरेज आणि 5000mAh बॅटरीसह सादर केला जाऊ शकतो. या डिवाइसची कंपनीनं अधिकृत माहिती दिली नाही, परंतु फोनमध्ये वॉटरड्रॉप स्टायल नॉच, आयताकृती कॅमेरा मॉड्यूल आणि IPS LCD डिस्प्ले दिला जाऊ शकतो. 

Vivo Y21T चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स 

Vivo Y21T स्मार्टफोन 4GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजसह सादर केला जाऊ शकतो. यातील स्टोरेज वाढवण्यासाठी कंपनी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देऊ शकते. हा विवो फोन 5,000mAh च्या बॅटरीसह बाजारात येईल. ही बॅटरी 18W फास्ट चार्जिंगनं चार्ज करता येईल. प्रोसेसिंगसाठी या Vivo स्मार्टफोनमध्ये Qualcomm चा Snapdragon 680 चिपसेट मिळू शकतो. तर फोटोग्राफीसाठी 50MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो.  

हे देखील वाचा: 

लै भारी! 35 हजारांच्या डिस्काउंटसह स्मार्टफोन घेण्याची शेवटची संधी, पुन्हा मिळणार नाही अशी ऑफर

Samsung युजर्स सावधान! अधिकृत अ‍ॅप स्टोरच करतंय धोकादायक अ‍ॅप्सचा प्रसार; अशाप्रकारे सुरक्षित ठेवा स्मार्टफोन

Web Title: Vivo y21t india launch timeline and specifications revealed  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.