कोणताही गाजावाजा न करता Vivo लाँच केला शानदार स्मार्टफोन; 27 दिवस चालेल याची बॅटरी 

By सिद्धेश जाधव | Published: December 20, 2021 12:25 PM2021-12-20T12:25:05+5:302021-12-20T12:25:29+5:30

Vivo Y32 स्मार्टफोन चीनमध्ये सादर केला गेला आहे. 8GB RAM, 5000mAh बॅटरी असलेला हा फोन कंपनीनं गुपचूप बाजारात आणला आहे.  

Vivo y32 with 5000mah battery 8gb ram launched in china   | कोणताही गाजावाजा न करता Vivo लाँच केला शानदार स्मार्टफोन; 27 दिवस चालेल याची बॅटरी 

कोणताही गाजावाजा न करता Vivo लाँच केला शानदार स्मार्टफोन; 27 दिवस चालेल याची बॅटरी 

Next

Vivo Y32 स्मार्टफोन कंपनीनं आपल्या ‘वाय’ सीरिज अंतर्गत सादर केला आहे. हा फोन बजेट सेगमेंटमध्ये सादर करण्यात आला आहे. यात 8GB RAM, 5000mAh बॅटरी आणि Snapdragon 680 प्रोसेसर असे फीचर्स देण्यात आले आहेत. हा फोन सिंगल चार्जवर 27 दिवसांचा स्टँडबाय टाइम देऊ शकतो, असा दावा कंपनीनं केला आहे. 

Vivo Y32 ची किंमत  

Vivo Y32 चा एकमेव व्हेरिएंट चीनमध्ये सादर करण्यात आली आहे. तिथे हा फोन 1,399 युआन (जवळपास 16,700 रुपये) मध्ये विकत घेता येईल. हा फॉगी नाइट आणि हरूमी ब्लू अशा दोन रंगात विकत घेता येईल. याच्या भारतीय तसेच जागतिक बाजारातील लाँचची माहिती मात्र कंपनीनं दिली नाही.  

Vivo Y32 चे स्पेसिफिकेशन्स  

Vivo Y32 हा एक 4G स्मार्टफोन आहे. यात 6.51 इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. स्मार्टफोनला Qualcomm Snapdragon 680 ची प्रोसेसिंग पॉवर देण्यात आली आहे. त्याचबरोबर 8GB RAM आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डनं वाढवता येईल. तसेच व्हर्च्युअल RAM च्या मदतीनं रॅम देखील 12GB पर्यंत वाढवता येतो.  

Vivo Y32 स्मार्टफोन Android 11 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 13MP चा प्रायमरी सेन्सर आणि 2MP चा सेकंडरी सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

Web Title: Vivo y32 with 5000mah battery 8gb ram launched in china  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.