धमाकेदार फीचर्ससह Vivo Y33s आणि Vivo Y21 येणार भारतात; लाँचपूर्वीच डिजाइन आणि स्पेसिफिकेशन्स आले समोर 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 06:55 PM2021-08-17T18:55:29+5:302021-08-17T18:56:02+5:30

Vivo Y33s and Y21: पुढल्या आठवड्यात Vivo Y33s आणि Vivo Y21 नावाचे दोन स्मार्टफोन बाजारात दाखल होऊ शकतात.

Vivo y33s and vivo y21 specifications and design leaked ahead of launch  | धमाकेदार फीचर्ससह Vivo Y33s आणि Vivo Y21 येणार भारतात; लाँचपूर्वीच डिजाइन आणि स्पेसिफिकेशन्स आले समोर 

सौजन्य: 91mobiles

Next

Vivo गेल्याच आठवड्यात भारतात आपल्या वाय सीरिजमध्ये Vivo Y53s स्मार्टफोन लाँच केला होता. आता या सीरिजमध्ये अजून दोन स्मार्टफोन्स लाँच करण्याची तयारी कंपनी करत आहे. पुढल्या आठवड्यात Vivo Y33s आणि Vivo Y21 नावाचे दोन स्मार्टफोन बाजारात दाखल होऊ शकतात. आता या स्मार्टफोन्सच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती इंटरनेटवर लीक करण्यात आली आहे. 91mobiles आणि टिपस्टर योगेश बरार यांनी मिळून विवोच्या आगामी स्मार्टफोन्सची माहिती दिली आहे.  

Vivo Y21 चे लीक स्पेसिफिकेशन्स 

Vivo Y21 स्मार्टफोन बजेट कॅटेगरीमध्ये सादर करण्यात येईल. या स्मार्टफोनमध्ये 6.51-इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात येईल. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये MediaTek Helio P35 चिपसेट मिळू शकतो. हा फोन 4GB RAM, 1GB एक्सटेंडेड RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेजसह सादर केला जाईल. या विवो फोनमध्ये Android 11 वर आधारित Funtouch OS 11.1 देण्यात येईल. Vivo Y21 मधील ड्युअल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 13MP चा मुख्य कॅमेऱ्यासह 2MP ची सुपर मॅक्रो लेन्स मिळू शकते. या फोनमध्ये 8MP चा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. या विवो फोनमधील 5,000mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.  

हे देखील वाचा: लई भारी! कमी झाली विवोच्या फ्लॅगशिप स्मार्टफोनची किंमत; जाणून घ्या 12GB रॅम असेलल्या Vivo X60 ची नवीन किंमत

Vivo Y33s चे स्पेसिफिकेशन्स 

Vivo Y33s स्मार्टफोनमध्ये 6.58-इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले मिळू शकतो. प्रोसेसिंगसाठी कंपनी या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G80 चिपसेट, 8GB रॅम, 4GB एक्सटेंडेड रॅम आणि 128GB स्टोरेज मिळू शकते. हा विवो फोन Android 11 आधारित Funtouch OS 11.1 वर चालेल. या विवो फोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा, 2MP चा बोकेह सेन्सर आणि 2MP ची मॅक्रो कॅमेरा लेन्स देण्यात येईल. तसेच या फोनमध्ये 16MP चा सेल्फी कॅमेरा मिळेल. या विवो फोनमधील 5,000mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्जिंगसह सादर करण्यात येईल.  

Web Title: Vivo y33s and vivo y21 specifications and design leaked ahead of launch 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.