5,000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेऱ्यासह आला Vivo Y51A; जाणून घ्या किंमत
By सिद्धेश जाधव | Published: June 28, 2021 04:34 PM2021-06-28T16:34:31+5:302021-06-28T16:36:55+5:30
Vivo Y51A 6GB Ram variant launch: कंपनीने विवो वाय51ए चा नवीन आणि छोटा रॅम व्हेरिएंट भारतात लाँच केला आहे.
Vivo ने Vivo Y51A स्मार्टफोन यावर्षीच्या सुरुवातीला भारतात लाँच केला होता. हा फोन कंपनीच्या वाय सीरिजमधील वाय51 चा अपग्रेडेड मॉडेल होता. आता कंपनीने विवो वाय51ए चा नवीन आणि छोटा रॅम व्हेरिएंट भारतात लाँच केला आहे. विवो वाय51ए च्या नव्या आणि जुन्या व्हर्जनमध्ये फरक फक्त रॅमचा आहे, या स्मार्टफोनचे इतर स्पेसिफिकेशन्स एकसारखे आहेत.
Vivo Y51A ची किंमत
Vivo Y51A च्या नव्या 6GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 16,990 रुपये आहे. तर या स्मार्टफोनचा 8GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिएंट 17,990 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला होता.
Vivo Y51A चे स्पेसिफिकेशन्स
Vivo Y51A मध्ये 20:9 अस्पेक्ट रेशियोसह 2408 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.58 इंचाचा फुलएचडी+ एलसीडी आयपीएस वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 11 आधारित फनटच ओएस 11 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 662 चिपसेट देण्यात आला आहे. भारतात हा फोन 6 जीबी/8जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. या स्मार्टफोनची मेमरी माइक्रोएसडी कार्डने 1 टीबी पर्यंत वाढवता येईल.
Vivo Y51A मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. तसेच या फोनमध्ये 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा फोन 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो.